गुरुगीता

गुरुगीता पठन
GuruGita_Marathi

श्री गुरुगीतेचे महत्व जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्याला शिव व पार्वती यांचे खरे स्वरूप जाणून घ्यावयास हवे.संपूर्ण भारतात इतर देवतांच्या तूलनेने शिवमंदिरांची संख्या अधिक आहे. अनादि काळापासून कुठल्याही शिवमंदिरात शिव मूर्ति पहावयास मिळत नाही. शिवतत्वाचे प्रतीक म्हणून शिवलिंग प्रतिष्ठापित करण्याची प्रथा आहे.

शिवलिंग म्हणजेच आदिशिव असे मानले गेले आहे. शिवलिंग म्हणजे काय? त्याचा आकार असा का आहे? शिवपार्वतीचे नाते सर्वश्रुत आहे, पण त्याचा खरा अर्थ काय? शिवपार्वती म्हणजे काय?

पार्वती ही आदिमाया असून जिच्या शक्तिमुळे, मायेमुळे या सृष्टिचे चलनवलन होते. शिव व आदिशिव ही महादेवांचीच दोन रुपे आहेत. अणुरेणु संरचनेशी याचा काही संबंध आहे का? अणुरेणु संरचना आपण समजून घेऊ. अणुच्या केन्द्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन धनाभरित असतो. न्यूट्रॉन हा अलिप्त असतो. या केन्द्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतो. इलेक्ट्रॉन हा ऋण भारित असतो. यालाच मैत्रेय ऋषिनी फसरेणु असे म्हटले आहे. फस म्हणजे जीव( प्रोटॉन + न्यूट्रॉन). या भोवती इलेक्ट्रॉन फिरणारा रेणु म्हणजे इलेक्ट्रॉन. रेणु म्हणजेच रेणुका, आदिमाया. आध्यात्मिक भाषेत सांगायचं म्हणजे ज्या पासून या सृष्टिची निर्मिति झाली तो शिव. पण तो न्यूट्रॉन प्रमाणे अलिप्त असतो. आदिशिव हा प्रोटॉन प्रमाणे कार्यरत असून ज्याच्या शक्तिमुळे मायेची (इलेक्ट्रॉन)ची  निर्मिति झाली. इलेक्ट्रॉन सतत एका कक्षेत केन्द्रका भोवती फिरत असतात. त्यातील अंतर कधीही कमी जास्त होत नाही. दोन वेगवेगळ्या अणुच्या संयोगातुन नवीन अणुची निर्मिति होते. अशा पद्धतीने विश्वाचि निर्मिति झाली. शिवलिंग हे अणु रेणु संरचनेच प्रतीक आहे. शिवलिंग हे केन्द्रकाचे प्रतीक असून त्याभोवती असणारी साळुंखि म्हणजे इलेक्ट्रॉनचे प्रतीक आहे. म्हणूनच संत म्हणतात परमेश्वर हा चराचरात भरलेला आहे.

आदिमाया पार्वती महादेवांना गुरु मानते. एकदा कैलासावर असताना पार्वतीने महादेवाना प्रश्न केला. गुरु म्हणजे काय? गुरुंचे स्वरूप कसे ओळ्खावे ? गुरु भक्ति कशी करावी ? या प्रश्नाचे महादेवांनी दिलेले उत्तर म्हणजे गुरूगीता. या मंत्रांना मंत्राचा राजा म्हणतात. कारण हे मंत्र प्रत्यक्ष महादेवांच्या मुख़ातून प्रस्तुत झाले आहेत. तर्कदृष्टया असा प्रश्न उभा राहतो की हे मंत्र आपल्या पर्यन्त कसे पोहचले? प्रश्न रास्त आहे.

ऐन महाभारत युद्धाच्या वेळी भगवान कॄष्णाने संगीतालेली भगवतगीता अर्जुन सोडून अजुन दोन व्यक्ति ऐकत होत्या. एक म्हणजे संजय आणि दूसरे व्यास. व्यासानी ती ऐकली व संकलित करुन लोकांसमोर आणली. परमेश्वराचे तसे नियोजन होते. जसे महादेवानी रामाचे जे गुणगान केले ते बुधकौशिक ऋषिनी ध्यानावस्थेत ऐकले व संकलित केले. ती म्हणजे रामरक्षा. देवाने गुरुगीतेचीही अशीच व्यवस्था केली होती. महादेवांच्या मुख़ातून प्रस्तुत होणारी गुरुगीता व्यासानी ऐकली  व संकलित करुन लोकांसमोर आणली. अन्यथा मानवापर्यंत हे मंत्र ज्ञान कधीच पोहचु शकले नसते. परमेश्वर नेहमी मानवाच्या कल्याणाकरीता अशी व्यवस्था करीत असतो.

महादेवानी गुरुगीतेमध्ये गुरुस्तवन केले आहे. गुरुभक्ति कशी करावी यावर भाष्य केल आहे.

ध्यानमुलं गुरूरमूर्ती:पूजामुलं गुरो: पदम।। मंत्रमुलं गुरोरवाक्याम मोक्षमुलं गुरो:कृपा।।

या मंत्रामध्ये साधकासाठी,शिष्यासाठी मोक्षापर्यंतचा प्रवास अधोरेखित केला आहे.तसेच सृष्टितिल इतर गुपितेहि कूट भाषेत दिलेली आहेत. भाषालंकार वापरल्याने त्यातील गूढार्थ पटकन ध्यानात येत नाही.

तदेजति तन्नेजती तददुरे तत्समिपके। तदन्तरस्य सर्वस्य तदु: सर्वस्य बाह्यता:।।

या मंत्रात महादेवानी अणु रेणु संरचना संगीतली आहे. ज्याच्या उहापोह आपण वर केलेला आहे.

अंगुष्ट मात्र पुरुषं ध्यायद चिन्मयम हृदी

या मंत्रात अंगठ्याएवढा असणारा कारण देह व महाकारण देह यावर भाष्य केल आहे. संपूर्ण गुरुगीता ही सृष्टि ,शरीर विज्ञान, चक्र, नाडया, कुंडलिनी शक्ति यांच्या गुढ़ार्थाने भरलेली आहे. महादेवांनी जणु विश्वातील ब्रम्हज्ञान प्राप्त होण्यासाठी आचरणात आणावयाचा  गुरुमार्ग प्रक्षेपित केला आहे.

सदगुरु भाऊ महाराजांनी अथर्वशीर्षाबरोबर गुरुगीतेचेही प्रशिक्षण सुरु केले. अज्ञात असलेली गुरुगीता सर्वाना माहित झाली. गुरुगीतेच्या पठणामागे आणखी एक महत्वाच कारण आहे. अथर्वशीर्षाने शरीरातील उष्णकेंद्र जागृत होतात. शरीरात उष्णता निर्माण होते. शिवस्वरोदय शास्त्राप्रमाणे सूर्य नाडी चालू होते व शरीरातील उष्णता वाढू लागते. साधनेत सूर्य नाडीबरोबर चंद्र नाडीचेही तितकेच महत्व आहे. चंद्र नाडीमुळे शरीरात शितकेंद्र जागृत होऊन शीतलता निर्माण होते. या दोन्ही नाड्यांचे चलनवलन नियमानुसार झाल्यास साधकाची आध्यात्मिक प्रगती सुरू होते. अथर्वशीर्षाने निर्माण झालेली उष्णता गुरुगीतेने कमी होते. उष्णतेचे नियमन होते.अथर्वशीर्षाने मूलाधार चक्र जागृत होते तर गुरुगीतेने स्वादिष्ठांन चक्र जागृत होते. क्रमाक्रमाक्रमाने  चक्रजागृतीची शृंखला सुरू होते.

साधकाची स्मरणशक्ती वाढावी व त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नति व्हावी या हेतुने भाऊं महाराजांनी मुंबईत या प्रशिक्षणास सुरवात केली. यामागे आणखी एक उदात्त हेतू भाऊंचा होता. आध्यात्मिक पाया असलेला सुजाण नागरीक घडावा. जो या देशसेवेत आपलं योगदान देईल. उत्तम नागरिक घडण्यासाठी त्या व्यक्तीचा  विचारांचा पाया हा आध्यात्मिक, नैतिक मूल्याचा असावा. काळानुसार आताची पिढी वाया जाऊ नये म्हणून हा सुसंस्काराचा यज्ञ भाऊ महाराजानी चालू केला. जो आजतागायत असाच चालू आहे .

|| श्री गुरुदेवदत्त ||