
॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥
श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥ श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥ माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥ सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥ सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाजऋषी गोत्र संभवा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफल संजाता । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ पीठिकापूर नित्यविहारा मधुमतीदत्त मंगलरूपा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥
श्री सिद्ध मंगल स्तोत्राचा भावार्थ
जो श्रीमद् अनंत महाविष्णु आहे, श्री म्हणजे लक्ष्मी ज्याने धारण केली आहे, जो नरसिंह अप्पलराज शर्मांचा पुत्र आहे. श्रीविद्याधरी, राधा, सुरेखा या बहिणींकडुन जो राखी बंधन स्विकारतो, सुमती मातेच्या वात्सल्य अम्रुतावर ज्याचे भरण पोषण झाले आहे, सत्यरुषीश्वर, पार्वतीपुत्र लाभ असे आजोबा,मातामह श्रीबापनाचार्य यांचा पौत्र, चरणांवर श्री म्हणजे लक्ष्मी धारण केलेला म्हणुन “श्रीपाद”, भारद्वाज महर्षींनी पार पाडलेल्या सवित्रुकाठक यज्ञाचे फल म्हणुन भारद्वाज गोत्रात अवतार धारण करणारा, “२४९८”, “दो चौपाती देव लक्ष्मीगण” या संखेचा उच्चार करत. स्रुष्टीचे रहस्य सांगणारा, पुण्यरुप आजी सौ राजमांबा यांच्या पुण्यगर्भातुन ज्या सुमती महाराणी जन्मल्या, त्यांचा पौत्र, जो सुमती मातेचा मुलगा आहे, जो नरहरी अप्पलराज शर्मांचा मुलगा आहे, जो देव दत्तात्रेय आहे, जो प्रभु आहे, जो पिठापुरी नित्य विहार करतो, जो आकर्षुण घेतो, मंगलरुप धारण करणा-या श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो,ते दिग्विजयी होवोत।
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन, काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात.