मंत्रपुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।।

ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: ।।

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे।

स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।।

कुबेराय वैश्रवणाया महाराजाय नम:।

ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपार्यायी स्यात् सर्वाभौम सार्वायुष आंतादापरार्धात् ।।

पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोको भिगीतो मरूत:परिवेष्ठारो मरूत्तस्यावसन् गृहे ।।

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वदेवा: सभासद इति ।। इति श्री मंत्रपुष्पांजली (देवतेचे नांव) चरणार्पणमस्तु ।।

मंत्रपुष्पांजलीचा भावार्थ – प्रत्येक आरतीनंतर आपण जी मंत्रपुष्पांजली भक्तिभावाने म्हणतो ती आपल्या हिंदुधर्मीयांच्या एका उज्वल परंपरेची आणि ज्वलंत राष्ट्रनिष्ठेची द्योतक आहे. ह्या मंत्रपुष्पांजलीचा भावार्थ पुढीलप्रमाणे :

देव यज्ञानेच यज्ञाची पुजा करीत असत. यज्ञ हाच प्रमुख धर्मविधी मानला जात होता. यज्ञ करूनच देव मोठे झाले. देवपदी पोहचले आणि दु:ख, क्लेश, चिंतारहित अशा स्वर्गाला जाऊन पोहचले. सर्वेश्वर्यसंपन्न, सामर्थ्यवान असा जो वैश्रवण नावाचा कुबेर त्याला आम्ही नमस्कार करतो. तो सर्व इच्छांची पूर्ती करणारा कुबेर माझ्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करो, मला निरंतर कल्याण प्राप्त होवो. आमचा सर्व सामर्थ्यवान सार्वभौम राजा साम्राज्य, भोजराज्य, स्वराज्य, विस्तीर्ण प्रदेशात पसरलेले असे अत्यंत श्रेष्ठ महाराज्य, अधिराज्य ही सर्व जगाच्या अंतापर्यंत सप्तसमुद्रांसह पृथ्वीच्या सम्राटपदी राहून भूषवो. अविक्षित नावाच्या कुळात जन्मलेल्या मरूताच्या घरी वास्तव्य करणाऱ्या देवांचे तसेच समस्त मरूद् गणांचेही सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत. समुद्रवलयांकित पृथ्वीचे राज्य आपल्या राजाला मळावे म्हणजेच राष्ट्र सर्व जग व्यापणारे व्हावे अशी युयुत्सु मनोकामना बाळगणाऱ्या आपल्या पुर्वजांच्या राष्ट्रीय मनोभूमिकेचे दर्शन आपणांस ह्य मंत्रपुष्पांजलीमधून होते.