
लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे नित्यपठण आपल्या विचारात, प्रारब्धात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी घडू लागतात, मन आपल्या ताब्यात येऊ लागते. मनावर ताबा मिळवण्याची सद्यस्थितीत खूप गरज आहे. त्यासाठी नित्योपासना करणे गरजेचे आहे. इथे भाऊ महाराजांनी शिकवलेली स्तोत्रं अर्थसहित दिलेली आहेत. ही रोजच्या पठणात मठामध्ये म्हटली जातात. तसेच सर्व शिष्य यांचे नित्यपठण करतात.