देवी मंत्र

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नामोस्तुते।

अर्गला स्तोत्र व सिध्दकुंजिका स्तोत्र

सप्तशती हा ग्रंथ ‘मार्कण्डेय पुराण’ या महाग्रंथाचा एक अंश मानला जातो. ह्या ग्रंथाचे पारायण करण्यापूर्वी कवच, अर्गला व कीलक या तीन स्तोत्रांचे पठण करणे हे अत्यावश्यक आहे. ही स्तोत्रे सुरूवातीला का म्हणायची याची कारणेही तितकीच महत्वाची आहेत. कवच म्हणजे आच्छादन. त्याकाळी तलवारीच्या वारापासून बचाव होण्यासाठी सैनिक अंगावर चिलखत चढवित असत. चिलखत कवचाचे कार्य करते. म्हणून भक्ताला पारायण (अर्थात साधना) करण्यापूर्वी त्या देवतेचे अदृश्य संरक्षण कवच निर्माण करायचे असते. ते मंत्रांनी निर्माण होते. ह्या स्तोत्रांची देवता स्वत: जगदंबा आहे. आपल्या देहातील प्रत्येक अवयवाचे रक्षण करणारी देवी नऊ अंगांनी (देवीची नऊ नावे) रक्षण (कवच निर्माण) करते. म्हणून ह्या स्तोत्रात सर्व दिशांपासून रक्षण करण्यासाठी देवीला प्रार्थना केलेली आहे. एवढेच नाही तर देवीच्या उपासनेने प्राप्त होणारे यश, गुण, पुत्र, किर्ती इ. गोष्टींचेही रक्षण करण्याकरीता देवीला साकडं घातलेलं आहे. कवच स्तोत्र पठण केले असता भक्ताला अपमृत्यु येत नाही. भूत-प्रेत बाधा होत नाही. सर्व व्याधी नष्ट होतात.

अर्गला स्तोत्र हे एक वैशिष्ठयपूर्ण स्तोत्र आहे. काही वेळेला उपासनेने भक्ताला काही फळ मिळते. त्या फळालाही काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. अर्गला स्तोत्र या अडथळयाला नष्ट करते. मुळात हे स्तोत्र भगवान नारायणांनी निर्माण केले. पुढे मार्कण्डेय ऋषींनी त्याचा अनुवाद केला. श्रीहरीनी हे स्तोत्र निर्माण केले म्हणून त्याची शक्ती देवता ही श्रीमहालक्ष्मी मानली जाते. या स्तोत्राच्या शेवटी जो श्लोक आहे तो असा:

इदं स्तोत्रं पठत्वा तु महास्तोत्र पठेन्नर:। सतुसप्तशती संख्यावरमाप्नोति सम्पदाम्।।

याचा अर्थ असा, सप्तशती या संख्येइतकी संख्या असलेल्या संपत्तीची प्राप्ती या अर्गला स्तोत्राने सप्तशती ग्रंथाचे पारायण करणाऱ्याला प्राप्त होते. या दोन स्तोत्रानंतर पठण करायचे असते ते कीलक स्तोत्राचे. कीलक याचा अर्थ बंधन करणे. उपासनेने जे फल प्राप्त होते त्याला काहीवेळेला प्रतिबंध होण्याचा संभव असतो. त्याला बांधून (बंधन करण्याचे) ठेवण्याचे कार्य कीलक करते. या स्तोत्राचे निर्माण कर्ते भगवान शिव असून शक्ती देवता श्रीमहालक्ष्मी असून याच्या पठणाने भक्त ऐश्वर्यवान होऊन मोक्षही प्राप्त होतो. साक्षात देवी भक्ताच्या ह्दयात वास करते. कुंजिका व अर्गला ही दोन स्तोत्रे भाऊंनी वाशिंद मठामध्ये शिकविली. कुंजिका स्तोत्र शिकविल्या बरोबर वाशिंदला अचानक पाऊस सुरू झाला. ढगांचा गडगडाट होऊ लागला. वीजा जणू जमिनीवर कोसळत आहेत असा भास होऊ लागला. प्रतिक्षण पावसाचा जोर वाढत होता. या गोष्टीनं सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. इकडे सर्वांची भीतीने गाळण उडत असताना भाऊ निश्चिल बसून होते. काही काळाने पाऊस थांबला. आभाळही उघडलं. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तितक्यात भाऊंनी साऱ्या भक्तमंडळींसाठी चहा करण्यास सांगितले.

एकाने भाऊंना विचारले, आपण कुंजिका स्तोत्र शिकवून पूर्ण करताच इतका भयंकर पाऊस कसा आला? काही चुकलं का? तेव्हा भाऊ हसून म्हणाले, देवीचं मूळ रूप अति भयानक अशाच स्वरूपाचे आहे. तिने पावसाद्वारे, ढगांच्या गडगडाटात आपलं अस्तित्व दाखवून गेली. बघा अवघ्या पाच-दहा मिनिटांचा तो खेळ झाला. आता सर्व शांत आहे. आकाशात कुठेही ढग दिसत नाही. स्वच्छ, निरभ्र झालंय! आणि खरंच, आकाशात एकही ढग दिसत नव्हता. फक्त निळेभोर आकाश सर्वांना पहावयास मिळत होते. हे कुंजिका स्तोत्र ज्यांनी शिकले त्यांना एक वरदानच देवी देऊन गेली. पुढे चैत्र अष्टमीला, नवरात्र अष्टमी या दिनी भाऊ होम-हवन होत असताना अर्गला व कुंजिका ही दोन स्तोत्र सर्वांकडून पठण करून घेत असत. आजही होमाला पठण केली जातात.

।। अथार्गलास्तोत्रम्।।

अस्य श्रीअर्गलास्तोत्रमंत्रस्य विष्णुऋषि: अनुष्टुप् छन्द:, श्रीमहालक्ष्मीर्देवता, श्रीजगदंबा प्रीतये सप्तशतीपाढाङ्रजपे विनियोग:।। ॐ नमश्चण्डिकायै।। जयन्ती मङ्रला काली भद्रकाली कपालिनी।। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते।।1।। मधुकैटभविद्रावि विधातृवरदे नम:।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।।2।। महिषासुरनिनाशविधात्रि वरदे नम:।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 3।। वन्दितांघ्रियुगे देवि सर्वसौभाग्यदायिनी।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 4।। रक्तबीजवधे देवि चंडमुंडविनाशिनि ।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 5।। अचिन्त्यरूपचरिते सर्वशत्रुविनाशिनि।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 6।। नतेभ्य: सर्वदा भक्त्या चण्डिके दुरितापहे।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 7।। स्तुवद्भयो भक्तिपूर्व त्वां चण्डिके व्याधिनाशिनि।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 8।। चण्डिके मततं ये त्वामर्चयंतीह भक्तित:।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 9।। देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवि परं सुखम्।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 10।। विधेहि द्विषतां नाशं विधेही बलमुच्चकै:।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 11।। विदेही देवि कल्याणं विदेही परमां श्रियम्।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 12।। विद्यावंन्त यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं करू।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 13।। प्रचण्डदैत्यर्पघ्ने चण्डिके प्रणताय मे।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 14।। चतुर्भुजे चतुर्वक्त्रेसंस्तुते परमेश्वरी।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 15।। कृष्णेन संस्तुते देवि शश्वद्भक्त्या त्वमम्बिके।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 16।। हिमाचलसुतानाथसंस्तुते परमेश्वरी।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 17।। सुरासुरशिरोरत्ननिघृष्टचरणेम्बिके।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 18।। इन्द्राणीपतिसद्भावपूजिते परमेश्वरी।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 19।। देवि भक्तजनोद्दामदत्तानन्दोदयेम्बिके।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 20।। पुत्रान्देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे।। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।। 21।। पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसाररिणीम्।। तारिणी दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्।। 22।। इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नर:।। स तु सप्तशतीसंख्यावरप्नोति सम्पदाम्।। 23।। मार्कण्डेयपुराणे अर्गलास्तोत्रम्।। 24।।

।। सिद्धकुंजिकास्तोत्रम् ।।

सिद्धकुंजिका मंत्र हा सिद्धमंत्र असल्याने आहे तसाच वाचून, म्हणून, ध्यान, जप-पूजा करावयाची असल्याने त्याचा अर्थ दिला नाही. शाप, पीडा, वामचारी बाधा, क्रिया यांचे उच्चाटन होण्यासाठी या मंत्राचा पाठ करावा असे भगवान शंकरांचे सांगणे आहे.

शिव उवाच

श्रृणु देवि प्रवक्ष्यामि कुंजिकास्तोत्रमुत्तमम्। येन मत्रप्रभावेण चण्डीजाप: शुभो भवेत।। 1।। न कवचं नार्गलस्तोत्रं कीलकं न रहस्यकम्। न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम्।। 2।। कुंजिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत्। अति गुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम्।। 3।। गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरीव पार्वति। मारणं मोहनं वश्यं स्तम्भनोच्चाटनादिकम्। पाठमात्रेण संसिद्धयेत् कुंजिकास्तोत्रमुत्तमम्।। 4।।

अथ मंत्र:

ॐ ऐं ऱ्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे।। ॐ ग्लौं हुं क्लीं जूं स: ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ऱ्हीं क्लीं चामुण्डायै विच्चै ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा

।। इतिमंत्र:।।

नमस्ते रूद्ररूपिण्यै नमस्ते मधुमदि&नि।। नम: कैटभहारिण्यै नमस्ते महिषादि&नि।। 1।। नमस्ते शुम्भहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिनि।। 2।। जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरूष्व मे।। ऐंकारी सृष्टिरूपायै ऱ्हींकारी प्रतिपालिका।। 3।। क्लींकारी काम-रूपिण्यै बीजरूपे नमोस्तु ते।। चामुण्डा चण्डघाती च यैंकारी वरदायिनी।। 4।। विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मत्ररूपिणि।। 5।। धां धीं धूं धूर्जटे: पत्नीं वां वीं वूं वागधीश्वरी। क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शूं मे शुंभ कुरू।। 6।। हुं हुं हुं हुंकाररूपिण्यै जं जं जं जम्भनादिनी।। भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नम:।। 7।। अं कं चं टं तं पं यं शं वीं जुं ऐं वीं हं क्षं धिजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरू कुरू स्वाहा।। पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा।। 8।। सां सीं सूं सप्तशती देव्या मत्रसिद्धिं कुरूष्व मे।। इदं तु कुंजिकास्तोत्रं मत्रजागर्तिहेतवे।। 9।। अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति।। कुंजिकया देवि हीनां सप्तशती पठेत्।। न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा।। 10।। इति श्रीरूद्रयामले गौरीतन्त्रे शिवपार्वतीसंवादे कुंजिकास्तोत्र सम्पूर्णम्।

।।ॐ तत्सत्।।