मंत्रोपचार

||श्री गुरुदेव दत्त||

ओंकार..  विश्वाची सुरवात ओंकाराने झाली. आपल्या भारतीय आध्यात्मशास्त्राचा पाया रचला गेला तो सुद्धा ओंकारानेच. कोणत्याही मंत्राची सुरवात होते ओमच्या उच्चाराणे. ह्या मंत्राच्या उच्चराणीच भाऊ महाराजांच्याही आयुष्याची सुरवात झाली. त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. ह्याची ओळख करून दिली मोगरने वाडीतील परमपूज्य मराठे गुरुजींनी. लहानपणी भाऊ तोतरे बोलत असत. त्यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची भीती बनली होती. भाऊंच्या आजींनी त्यांना मराठे गुरुजींच्या ओंजळीत टाकले. आणि मराठे गुरुजींनी भाऊंना पहिला मंत्र शिकवला तो ओंकार. एका विशिष्ठ पध्दतीने तो म्हटला असता भाऊंचा तोतरेपणा पूर्णपणे नाहीसा झाला. भाऊंचा आत्मविश्वास वाढला. मनातली भीती नाहीशी झाली. मंत्रातली अदृश्य शक्तीची ओळख झाली. इथून भाऊंचचे आयुष्य आंतरबाह्य बदलले.

मराठे गुरुजींनी आपल्या ह्या शिष्याला पुढचा मंत्र दिला अथर्वशीर्ष. हे मंत्र गणपती मंत्र आहेत. गणपती ही बुध्दीची देवता मानली जाते. आपल्या शरीरतील मूलाधार चक्रामध्ये गणपतीचे स्थान मानले गेले आहे. तिथेच कुंडलिनी शक्तीचाही निवास असतो. आपल्या पूर्वजानीं सर्व मंत्राची रचना व मांडणी उच्चार शास्त्राच्या आधारावर केली आहे. ज्यामुळे त्या मंत्राच्या योग्य उच्चाराने मेंदूतील काही भाग जागृत होण्यास मदत होते. ह्याच्या नित्य पठाणाने काही दिवसाने आपल्या लक्षात येते की बऱ्याचशा गोष्टी सहज लक्षात राहू लागतात. हाच अनुभव भाऊनाही आला. त्यांच्या  आत्मविश्वास दुणावला. मराठे गुरुजींच्या चाणाक्ष नजरेने ही गोष्ट ताडली. आणि त्यांनी भाऊंना जिल्हा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. संपूर्ण जिल्ह्यातून भाऊंचा पहिला नंबर आला. संपूर्ण गावाने त्यांचा सत्कार केला. शिष्याची झालेली प्रगती पाहून गुरुजींचा उर भरून आला. ही सुरवात होती. गुरुजींनी आता गती वाढवली होती. त्यांनि त्यांच्या ह्या शिष्याला सर्वार्थाने घडवायचे होते. त्यांनी पुढचा मंत्र शिकवला रामरक्षा. रामरक्षेचा अनुभव तर भाऊंच्या आयुष्याला खूप वेगळे वळण देऊन गेला. गुरुजींनी भाऊंना रामरक्षा शिकवली. गुरुजींनी कोणताही मंत्र शिकवावा आणि भाऊंनी तो त्वरित तोंडपाठ करावा हे समीकरणच झाले होते.

काही दिवसांनी गावातल्या बायकानी गुरुजींना सांगितले की पुलावरून येताना एक साकव, तो पूल जोरात हलवतो. चित्रविचित्र आवाज काढून त्यांना घाबरवतो. कृपया त्यावर काही उपाय करावा. गुरुजींनी भाऊंना बोलावून घेतले आणि सांगितले. तू त्या पाण्यामध्ये उभा राहुन रामरक्षा पठण कर. भाऊंनी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कंबरभर पाण्यात उभे राहून रामरक्षा करण्यास सुरवात केली. काही वेळाने एक १० – १२ फूट उंच अशी व्यक्ती हात जोडून भाऊंच्या समोर उभी राहून विचारात होती. मला कशाला बोलवले. भाऊंना पाण्यात असून सुद्धा घाम फुटला. पण एक गोष्ट लक्षात आली की तो साकव नम्रपणे विचारतो आहे. तेवढ्यात गुरुजींनी मागून उत्तर दिले, तुला मी बोलवले आहे. हे ठिकाण सोडून तू इथून त्वरित निघून जा. आणि तेव्हा पासून गावातल्या बायकांना होणारा त्रास थांबला. भाऊंना मंत्राचा अजून एक अनुभव मिळाला होता. गुरुजींनी दिलेल्या मंत्रसाधनेने त्यांचा पाया मजबूत झाला होता. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. दत्त महाराजांच्या आदेशने त्यांनी दत्तभक्तीच्या प्रसाराची सुरवात करण्याचे ठरवले. पण प्रश्न होता सुरवात कशी करावी. त्यावेळी लालबाग परिसरातील भालचंद्र मंदिरात पिंडीवर पाय ठेवलेल्या स्तिथीत दत्त महाराजांचे दर्शन झाले. महाराजांनी उदाररोचन पद्धतीने घोरात्कष्टउद्धरण स्तोत्र शिकवले. आणि दत्तभक्तीच्या प्रसाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. भाऊंनी आपल्या संपुर्ण शिष्यावर्गला अनेक मंत्र शिकवले. पठन करून घेतले आणि त्यात पारंगत बनवले. खाली मंत्र दिले आहेत. जे नेहमीच्या उपासनेत मठामध्ये म्हटले जातात.

निसर्गातील मानवाचा पहिला मित्र जर कोण असेल तर तो म्हणजे ध्वनीं.  मानवाच्या ज्ञानेंद्रियात, श्रवणेंद्रिय हे अति महत्वाचे इंद्रिय आहे. निसर्गातील अनेक गोष्टींचे ज्ञान  प्रथम आपल्याला श्रवणातून मिळते. डोळ्यांची क्षमता फार कमी असते. फार दूरच आपण पाहू शकत नाही. परंतु एखादया दूरच्या ठिकाणाहुन कसलाही मोठा आवाज आला तरी त्याचा अर्थ आपल्याला कळतो. हवेच्या माध्यमातून प्रति सेकंद ११०० फूटापर्यंत निर्माण होणारे तरंग म्हणजे ध्वनी. श्वासोच्छ्वासाच्या नैसर्गिक क्रियेतून मानव मुखातून ध्वनी निर्माण करू शकतो. जेंव्हा प्रगत भाषेचा उदय झाला नव्हता, तेंव्हा मानव वेगवेगळ्या आवाजाच्या माध्यमातून आपले विचार प्रकट करीत होता. आजही जंगलातील लोक ही भाषा वापरतात. जगाच्या पाठीवर असे एक गाव आहे ज्या गावातील लोक वेगवेगळ्या शिट्ट्या वाजवून आपले विचार दुसऱ्याकडे पोहचवतात. याच ध्वनीचा वापर करून आपल्या पूर्वजांकडून आज ज्ञात असलेली भाषा जन्माला आली. प्रत्येक प्रांतात वेगळी भाषा जन्माला आली. अशा तर्हेने अनेकविध भाषांचा जन्म झाला. भाषेमुळे मानवाचे जीवन समृद्ध झाले. तत्कालीन बुद्धीश्रेष्ठींनी या भाषेचा वापर करून विशिष्ठ उच्चराच्या संगतीने मंत्राची निर्मिती केली. जे मंत्र उच्चार शास्त्रावर (phonetic science) वर  आधारलेले होते. त्यासाठी त्यांनी संस्कृत भाषेची निवड केली.

आपल्या मुखातून निर्माण होणारे सर्व सूर केवळ कंठातूनच निर्माण होत नसतात. काही सूर कंठातून निघतात त्यांना कंठव्य म्हणतात. काही सूर दाताच्या माध्यमातून निर्माण होतात त्यांना दंतव्य म्हणतात. काही सूर ओठांच्या मदतीने निर्माण होतात त्यांना ओष्ठय म्हणतात. काही सूर नाभीतुन निघतात ज्याला आपण खर्जा म्हणतो. काही सूर टाळूला आघात करून निघतात त्याला तालव्य म्हणतात.या प्रत्येक सुरांची आवर्तने म्हणजे कंपनता वेगवेगळी असते. प्रत्येक सुरातून वेगळा परिमाण साध्य होत असतो. पूर्वसूरींनी मंत्रांची, ऋचांची, स्तोत्रांची रचना विशिष्ट छंदात केली आहे. या छंदात मंत्र म्हटले असता विविक्षित कंपने निर्माण होतात. आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांनी यात बांधली आहे ती म्हणजे कुंभक. आपण जो श्वास घेतो त्याला पूरक म्हणतात. आत जो श्वास कोंडला जातो त्याला कुंभक म्हणतात. कोंडलेला श्वास सोडल्या वर त्याला रेचक म्हणतात. या मध्ये कुंभक हा फार महत्वाचा आहे. स्वल्प कुंभक, अल्प कुंभक, दीर्घ कुंभक असे अनेक प्रकार आहेत. कुंभक ही आपल्या हृदयासाठी मिळालेली देणगी आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आपलं हृदय सतत धडधडत असत. त्याला कधीच विश्रांती मिळत नाही. आपण मेल्यावरच त्याला विश्रांती मिळते. धावताना किंवा घाबरल्यावर ही धडधडण्याची  तीव्रता वाढते. सेकंदाचा  काही भाग जरी आपण या हृदयाला विश्रांती देऊ शकलो तरी त्याच आयुष्य पटीने वाढते. ही क्षणभर विश्रांती कुंभक देतो. जेंव्हा श्वास कोंडला जातो तेंव्हा हृदयाची गती कमी होते. धडधडण्याची गती कमी केल्याने हृदयाचं आयुष्य वाढत. या विश्रांतीने ते अधिक कार्यक्षम होते. हे गणित पूर्वजांना माहीत असल्याने त्यांनी मंत्रामध्ये कुंभकाच जोडकाम केलं.

त्वम् ब्रम्हास्त्वम्, विष्णुस्त्वम्, रुद्रस्त्वम्, इंद्रस्त्वम्, अग्निस्त्वम्, वायुस्त्वम्,सूर्यस्त्वम् चन्द्रमास्त्वम् ,ब्रम्हभूर्भुवः स्वरोम्  हा एक पूर्ण कुंभक आहे. जो करताना देवाची स्तुतिही होत असते. कुंभक करताना ही देवाचे नावही श्वासाबरोबर हृदयात कोंडली जातात. ज्यायोगे अनाहत चक्र जागृत होत. अशा प्रकारे विविध उच्चाराने चक्र व नाडया जागृत करण्याच गणित या मंत्रशास्त्रात बांधल आहे. भाऊ महाराजांनी सहजोग साधनेचा पाया मंत्रशास्त्रावर उभा केला आहे. किंबहुना आपल्या कार्याची सुरवातच मुळी मंत्र शिक्षणातून केली. विविध मंत्रांचे शिक्षण सर्वाना मोफत दिले. त्याच महत्व पटवून दिल, अनुभव दिले. अथर्वशीर्ष, गुरुगीता ,रुद्र,गायत्री, रामरक्षा , कुंजीका स्तोत्र,अर्गला स्तोत्र, घोरतकष्टउद्धरण स्तोत्र, इंदुकोटी, आदौब्रह्म अशा अनेक मंत्रस्तोत्रांचे शिक्षण भाऊंनी आपल्या शिष्याना दिल व दत्तभक्तिसाठी परिपूर्ण बनविले.