वर्षातील अनेक सणा पैकी एक सण म्हणजे दसरा. सोन लुटण्याचा कार्यक्रम. सीमोल्लंघनाचा, आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस. साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त. हा मुहूर्त पूर्ण मुहूर्त आहे.साडेतीन मुहूर्त ,साडेतीन पीठ, साडेतीन मात्रेची सूत्र दर्शविणारी एक पाय वर असलेली कृष्णाची मूर्ती. या गोष्टीमध्ये नक्कीच काहीतरी इंगित लपलेलं आहे. या मुहूर्ताची कालावधीत पृथ्वीवर वैश्विक उर्जेचा झोत पाझरत असतो. परंतु ही उर्जा सर्व ठिकाणी समान नसून तीच स्वरूप कमी अधिक प्रमाणात असतें. तीर्थ स्थानी याच प्रमाण सर्वाधिक असते. आपल्या देवालयाना उंच कळस बांधलेले असतात. वर असलेलं कळसाचे टोक व आतील मुर्ती एका समांतर रेषेत असतात. विश्वातून प्रसारित होणारी पारलौकिक शक्ती स्पंदने मंदिराच्या काळसातून मूर्ती मध्ये प्रसारीत होतात व तिथून भक्तांमध्यें पाझरतात. याच कारणाने पूर्वी शिवलिंग हे टोकदार होत. विश्वातील शक्ती ग्रहण करून देवाच्या मूर्ती मार्फत भक्तांमध्ये प्रसारित करण्याचे साधे सोपे गणित आपल्या पूर्वजानी वेगळ्या भाषेत जगासमोर मांडले. या कालावधीत देवाच्या सन्निध, गुरूच्या सान्निध्यात राहावं अस सांगण्यात आलं आहे. सद्गुरूंच्या रुपात प्रत्यक्ष देवाची असीम शक्ती भूतलावर नांदत असते. या मुहूर्ताच्या कालखंडात ही वैश्विक ऊर्जा प्रचंड स्वरूपात सद्गुरूंच्या शरीरातून शिष्याकडे प्रसारित होत असते. तद्वत शिष्याने या काळात सद्गुरू सन्निध राहावं. भक्ताने एखाद्या तीर्थक्षेत्रात राहावं. याचा लाभ प्रत्येक शिष्याला मिळावा यासाठी भाऊंनी एका अभिनवं कल्पनेचे आयोजन केले.
खर सोन लुटणे – आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोन्याची पाने म्हणून वाटतो. भाऊ महाराजानी खरी सोन्याची पाने देण्याचा कार्यक्रम सुरू केला. जितके लोक या कार्यक्रमाला जमले असतील तितक्या चिठया बनविल्या जातात. त्या चिठीवर क्रमांक टाकले जातात. त्या चिठया एक मोठ्या बॉक्स मध्यें ठेवून हलविल्या जात. त्या पैकी ३ चिठया लहान मुलांकडून काढल्या जातत. ज्यांचा क्रमांक त्यात लिहिला असेल त्यांना खर सोन्याचं पान देण्यात येत. आजही ही प्रथा चालू आहे. आहे की नाही अभिनव कल्पना. दत्त भक्ती केल्याने वर्ष भरात भक्तांना जे अनुभव येतात त्याची पुस्तिका असावी या विचाराने भाऊंनी दसरा दिवाळी अंक सुरू केला. दसऱ्याच्या दिवशी हा अंक प्रकाशित केला जात असे. आज हा अंक दीपावलीच्या दिवशी प्रकाशित केला जातो.