
आपल्या सर्वांसाठी नेहमीच आनंद उत्साह आणि चैतन्य घेऊन येणारा सण. हिंदू धर्मामध्ये दीपावलीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी, मिष्टान्नची रेलचेल, नवनवीन पोशाख घालून मिरवण्याची संधी, पाहुण्यांचा पाहुणचार, आणि अस बरंच काही. एकंदरीत काय तर तुम्हा आम्हा सर्वां मुंबईकरांची दिवाळी म्हणजे गोड गोड दिवसांत भरून जाणारे रंगतदार क्षण, हेच रंगतदार दिवस भाऊंनी म्हणजेच सद्गुरू भाऊ महाराजांनी ‘गाणगापूर अष्टतीर्थ यात्रा’ यात रूपांतरित केले. त्यांच्या शिष्यासाठी त्यांनी दिवाळीच एक नवीन स्वरूप एक नवीन पर्व उदयास आणलं. ते म्हणजे ‘गाणगापूर अष्टतीर्थ यात्रा’ खरंतर अष्टतीर्थ यात्रा म्हणजे भरभरून पुण्य कमवुन देणारे दिवस किंवा अस ही म्हणू वर्षेभरासाठी लागणारा आनंद जमविण्याचा काळ. याची सुरवातच मठात आपलं पदार्पण झाल्यावर होते. पदार्पण हा शब्द प्रयोग करण्यामागचा हेतू हाच की भाऊंनी इथे शिष्यांच्या एका अभूतपूर्व प्रवासाची सुरवात करून दिली.
भाऊंच्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळेपण असायचं. त्यांनी मठात येणाऱ्या सर्व शिष्यांच्या स्वागतासाठी फटाके आणि ढोल ताशाचा गजर व्हावा अशी प्रथा सुरू केली. तसेच भाऊ स्वतः मुख्य दरवाजा जवळ उभे राहून सर्वावर गुलाबजलाच प्रोक्षण करत. अश्या प्रकारे झालेल्या अलौकिक स्वागताने सर्व शिष्यगण आनंदी आणि उत्साहित होऊन जात.
पहिली आंघोळ – दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस, आपली पहिली आंघोळ म्हणजे उठणं लावून, नारळाच्या दुधाने आंघोळ करणे म्हणजे नुसत बाह्य सूंदरतेत भर, पण आंतरीक सूंदरतेच काय? ज्या मनात किंवा हृदयात आपल्याला आपल्या देवासाठी जागा निर्माण करायची आहे. ती देखील स्वच्छ करायला हवी की नको? कारण त्या चीत्तचोर सावळ्या हरीची आवडती जागा ही तीच; ते म्हणजे आपलं हृदय, आणि ते स्वच्छ करण्याचे ठिकाण म्हणजे भाऊ महाराजांनी सुरू केलेली अष्टतीर्थ यात्रा. कारण ही फक्त पहिली अंघोळ नसून प्रत्यक्ष दत्त महाराजानं सोबत केले गेलेले अभ्यंग स्नान होय. कारण यादिवशी प्रत्यक्ष दत्त महाराज या आठही तीर्थत स्नान करतात. कित्येक भाविकांना या यात्रेत हा अनुभव देखील येतो. कस्तुरीच्या सुगंधातून महाराज कित्येक वेळा कित्येक भाविकांना आपली उपस्थिती दाखवतात. भाऊंमूळे हा योग अनुभवायची संधी सर्व शिष्याना मिळाली. भाऊंनी दिवाळीच्या या कार्यक्रमाची बांधणीच अशी केली आहे की कुठे ना कुठे तरी शिष्याना महाराजांची प्रचीती आल्यावाचून राहणार नाही.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी अष्टतीर्थ पार पडलं की पुढे पारायणची बैठक भाऊंनी घालून दिली. इथे पुरुष वर्गासाठी गुरुचरित्र पारायण तर स्त्रियांसाठी साईसत्तचरित्र पारायण त्याच सोबत पहिले ३ दिवस मुख्य मंदिरात संध्याकाळी ४ ते ६ भजनाचा कार्यक्रम. दत्त महाराजानां भजन फार प्रिय आहे. देवाच्या जवळ जाण्याचा हा एक मार्ग म्हणून भाऊंनी शिष्याना भजनाची आवड लावली. भाऊ स्वतःही खुप छान आळवत त्यांचं गाणं ऐकून एखाद्याची भाव समाधी लागल्या शिवाय रहाणार नाही. ज्या ज्या शिष्याना हा सुवर्णयोग मिळाला ते खरंच खुप भाग्यवान.
दिवाळी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम ही मठात विधीवत रुपात पार पडतो. भाऊ प्रत्येकच स्त्रीमध्ये लक्ष्मी रूप बघत असत. म्हणूनच मठात आलेल्या प्रत्येक स्त्रीला ते मानच स्थान देत. स्त्रियांसाठी मठ म्हणजे तीच स्वताच हक्काच माहेर. इथे आलेल्या प्रत्येक स्त्रीला, मुलींना आराम मिळावा, आनंद मिळावा म्हणून भाऊंनी कटाक्षाने काही नियम बनवले होते. ते म्हणजे मठातील महिला वर्गानी कोणत्याही कामाला हात लावू नये. गाणगापूर तसेच इतर मठातही स्त्रियांनासाठी त्यांच्या सोयीसाठी हेच नियम आहेत. जेणेकरून त्यांना त्यांचं माहेरपण उपभोगता येईल. तसेच त्यांच्या आवडीनिवडी आणि छंदासाठी भाऊंनी रांगोळी स्पर्धा तसेच मनोरंजनासाठी नृत्य स्पर्धा याच दिवाळीच्या कार्यक्रमात आयोजित केल्या.

गाणगापूर मधील मुख्य मंदीरात दररोज दत्त महाराजांची पालखी प्रदक्षिणा असते. या साप्ताहिक कार्यक्रमात आपल्याला देखील या पालखी खाली झोपायची संधी मिळते. तसेच देव मांडीवर घेणे. देवाला साखर भरवणे म्हणजेच मुख्य मंदीरात महाराजांची जी मुर्ती आहे. ती आपल्या मांडीवर दिली जाते.आणि त्यांना आपण आपल्या हाताने साखर भरवतो असा कार्यक्रम असतो. त्याच सोबत मुख्य मंदिरातील ब्राम्हणांद्वारे मठात कुलदेवता आवाहन केले जाते. ज्यात सर्व शिष्याच्या कुलदैवतेला आवाहन करून प्रसन्न केलं जाते. जेणेकरून त्याचे आशीर्वाद सदैव त्या शिष्याच्या पाठीशी उभे राहवेत. आणि त्याना कोणत्याही कामात अडीअडचणी येऊ नये. म्हणून कुलदेवता आवाहन सारख्या अश्या काही विधी भाऊंनी सुरू केल्या.

‘भाऊ’ म्हणजे आधार, भाऊ हे सद्गुरू तर होतेच. पण त्यांच्या प्रत्येक शिष्या सोबतची त्यांची नाती ही वेगवेगळी होती. कोणाला त्यांच्यात वडील दिसत, कोणाला आई, कोणाला मोठा भाऊ तर कोणाला बहीण. प्रत्येक शिष्य त्यांना त्याच्या मनातील असलेल्या स्थानाप्रमाणे भाऊबीज करत. भाऊबीजेच्या कार्यक्रमात ही वेगळे पण असायचं. भाऊंना भाऊबीज केली की ते आपला हात हातात घेऊन त्यांचा अत्तर लावलेल्या हात हातावर चोळत. आणि अश्या प्रकारे ते त्यांच्या जीवनातील सुगंध आपल्या शिष्याना वाटत असत. पारायण समाप्तीच्या दिवशी प्रत्येकाने माधुकरी मागण्यासाठी गावात गेले पाहिजे असा भाऊंचा कडक नियम असे. दत्त महाराजांना माधुकरी वाढणे आणि मागणे या दोन्ही गोष्टी प्रिय, म्हणूनच पारायण समाप्तीच्या दिवशी प्रत्येक जण पाच घरात जाऊन माधुकरी घेऊन येतात. मठात ज्या दिवशी पारायण सुरू होत त्या दिवशी एका मोठ पातेल्यात भस्म भरून गुरुचरित्र पारायण मांडणीच्या बाजूला सफेद कपड्याने बांधुन ठेवलं जाते. आणि पारायण समाप्तीच्या दिवशी ते उघडले जाते. भक्तांची हाक देव ऐकतो आणि वेळोवेळी त्याची प्रचितीही देतो. त्याची अनुभूती ते भस्माच पातेलं उघडल्यावर येते. कारण कधी त्यात बालदत्तपादुका, कधी त्रिशूळ, कधी डमरू, कधी हात, कधी स्वस्तिक अशी शुभ चिन्हे दिसतात. हम गया नही जिंदा है या वाक्याची साक्ष आजही ते देत असतात. कार्यक्रम संपल्यावर प्रत्येकाचं अंतःकरण जड झालेलं असत.भाऊंच्या सहवासाचा, देवभूमिचा, अतीव आनंदाचा स्पर्श काही काळाने आपल्या पासून दूर होणार.,आपण पुन्हा रहाटगाड्यात जाणार या विचाराने मुंबईला परत जाताना प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असायचे. आपल्या लेकरांना घरी जाताना पाहुन भाऊंच्याही नेत्रकडा ओल्या झालेल्या असायच्या. सर्वाना गेट वर सोडायला ते स्वतः येत. वरवर हसत मुखाने बायबाय करून भाऊ मठात परतत. परंतु आत कुठे तरी लेकरांच्या प्रेमाने मनात उमाळा फुलालेला असायचा. जो कधी कोणाच्या दृष्टीस पडला नाही. धन्य ती माऊली
दिवाळीच्या या वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत प्रत्येक शिष्य दत्तभक्तीत न्हाऊन जातो. भाऊंनी सुरू केलेल्या या अद्भूत कार्यक्रमात भक्त खऱ्या भक्तीत रममाण व्हायला लागतो.