देवी पारायण – दुर्गासप्तशती देवी माहात्म्य

विष्णूहुनि फार दयाळ । जगदंबा असे केवळ । पित्याहुनी स्नेह प्रबळ । जननीचा तो प्रसिद्ध ।।

मार्कंडेय ऋषीने लिहिलेल्या ह्या ग्रंथामध्ये देवीच्या मूळ रूपाची म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या अवताराची निर्मिती कशी झाली, ह्यांच खूप रसाळ असे वर्णन आले आहे. देवीचा पहिला अवतार महाकाली, ह्या अवतारची निर्मिती विष्णुदेहापासून झालेली असून मधू-कैटभ ह्या दोन राक्षसचा निःपात करण्यासाठी झाला. देवीचा दुसरा अवतार महालक्ष्मी, ह्या अवताराची निर्मिती सर्व देवांच्या देहापासून झालेली असून, सर्व देवतांनी आपापली आयुधे महिषासुर ह्या राक्षसचा वध करण्यासाठी सहाय्य म्हणून दिली. महिषासुरचा वध करून जगदंबेने सर्वांचे रक्षण केलं. देवीचा तीसरा अवतार महासरस्वती, ह्या अवताराची निर्मिती पार्वतीच्या देहापासून झालेली आहे. ह्या अवतारात तिने शुंभ निशुंभ, चंड मुंड, रक्तबीज अश्या अनेक राक्षसाची आपल्या अनेकविध रूपांनी अवतीर्ण होऊन नाश केला. आणि भविष्यात येणाऱ्या अश्या अनेक संकटातही केवळ हाक मारताच धावत येऊन संकट निवारण करेन अशी ग्वाहीही दिली आहे. विविध रूपे घेऊन केलेल्या दैत्याच्या संहारामुळेच तिला अनेकविध नावाने संबोधिले जाते.

ह्या ग्रंथाच्या पठणांने लक्षात येत, की आई आपल्या मुलांच्या रक्षणासाठी किती तत्पर असते. जो मातृत्वचा अंश आपल्याला स्वतःच्या आईमध्ये जाणवतो, तो खऱ्या अर्थाने जगदंबेच देणं आहे. आणि तिच्या उपकारांची जाण होऊन, आपण केवळ नतमस्तक होतो. दरवर्षी चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र ह्या दोन्ही नवरात्रमध्ये वाशिंद मठामध्ये घटस्थापना केली जाते. त्याशिवाय ह्या दोहीं नवरात्रीत अष्टमीला नवचंडी होम आणि चंडीयाग केला जातो. सदर ग्रंथाच पारायण सर्व शिष्यपरिवारतर्फे केलं जातं. ह्या काळामध्ये सर्वजण देवी सहस्त्र नामावली सुद्धा पठण करतात.

भाऊ सांगत असत, संतती आणि संपत्ती ह्या गोष्टी देवीशी संबंधित आहे. तिच्या कृपादृष्टीशिवाय हे शक्य नाही. त्यासाठीच भाऊंनी आपल्या शिष्यांना अर्गला, कुंजरिका असे देवी मंत्र शिकवले. शिवाय शिष्याला त्याच्या कुलदैवतचे पाठबळ मिळावे म्हणून ‘कुलदैवत आवाहन’ हा एक उपचार दर दिवाळीला वैयक्तिकरित्या करून घ्यायची प्रथा पाडली. अशी ही जगदंबा, मातृहृदयाने आपल्या बाळांचे कित्येक जन्म पालनपोषण करत आहे.

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेंन संस्थितां ।नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः ।