ॐ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

मला फिरायला घेऊन चल! ह्या दत्त महाराजांच्या स्वप्न दृष्टांतानंतर २१ दिवसीय पायी पालखी कार्यक्रमचा अद्वितीय सोहळा पार पाडला गेला. दत्त महाराज पादुका स्वरूपात आपलं अस्तित्व घेऊन वाशिंद दहागावी येथील दत्त मंदिरात विसावले. हे दत्त तत्व जागृत ठेवण्यासाठी त्यावर विविध सोपस्कार करणे गरजेचे होते. त्यानुसार पहिला महिनाभर त्यावर रुद्राभिषेक करण्यात आले. त्यानंतर भाऊंनी आपल्या सर्व शिष्याना २१ दिवस अखंड नामस्मरण करण्याचा आदेश दिला. तेंव्हापासून साधारण दरवर्षी एप्रिल महिन्यात सदर नामस्मरणाची सुरवात केली जाते. सतत २१ दिवस अखंड नामस्मरण करणे, ह्यासाठी बऱ्याच भक्ताची गरज असते. आणि भाऊंचे सर्व शिष्यवर्ग ह्या सेवेत हिरहिरीने भाग घेतात. भाऊंनी ही सेवा कंटाळवाणी होऊ नये म्हणून त्यात विविधता आणली. ही सेवा तीन भागात विभागली. ह्यानुसार पहिला एक आठवडा टाळाच्या नादावर नामस्मरण करण्यात येत. दुसऱ्या आठवड्यात वीणा वादन करून नामस्मरण करण्यात येत. तर तिसऱ्या आठवड्यात हरीभजन करून नामस्मरण करण्यात येत. सेवा तीच पण प्रत्येकवेळी ती वेगळेपणाने केल्याने त्यातील वैविध्य खुलुन दिसते, आणि करणाराही कंटाळत नाही.
नामघोषाचे महत्व
आपणा सर्वाना एक गोष्ट नेहमी पहावयास मिळते की जैन धर्मीय हे इतर धर्मियांपेक्षा संपत्तीच्या बाबतीत पुढे आहेत. याच कारण आहे त्यांची साधना. जैन पंथातील प्रत्येकाला साधनेचे शिक्षण लहानपणा पासून दिले जाते. ते त्या बाबतीत खूपच सनातनी आहेत. त्यांच्या साधनेत लक्ष्मी योग गुंफलेला आहे. शिख समाज गुरुद्वारा मध्ये करीत असलेल्या अखंड भजनामध्येही हा भाग आलेला आहे. ज्याच्या कारणांनी त्याच्यावर लक्ष्मीचा वरद हस्त कायम असतो. हाच लक्ष्मी योग भाऊनी नामघोषात बांधला आहे. पिंपळेश्वर दत्त मंदिरात भाऊनी याचि सुरवात केली. प्रथम एक दिवस, नंतर तीन दिवस मग सात दिवस असा नामघोष वाढवत नेला. नियम एकच होता प्रत्येकाने किमान दोन तास नामघोष करायला पाहिजे असा दंडक घालून दिला. अनेक दत्तक्षेत्री दत्त जयंती निमित्त वीणावादन केले जाते. वारकरी पंथामध्ये वीणावादन केले जाते हे सर्वश्रुत आहे. नारदाने पाया घालून दिलेली वीणावादनाची नामसाधना भाऊनी वाशिंद मठात या कालावधीत अखंड सात दिवस चालू केली. वारकरी पंथाची ही पद्धत दत्तभक्ति मध्ये अंतर्भूत केली. अनेक पंथातील चांगल्या गोष्टी दत्तभक्ति मध्ये सामावून दत्तभक्तिला एक नवीन रूप दिल.
दत्तभक्ति भक्ताला विरक्ति कड़े घेऊन जाते ,असे असतानाही भाऊनी नामघोषातुन लक्ष्मियोग देऊन शिष्याच्या आर्थिक समस्या सोडवण्याचे विहित कर्म केले. लक्ष्मियोग दतभक्तित अंतर्भूत करवून घेतला.
नामसाठी त्वरा करा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।