कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी,
सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”रुद्र अभिषेक” हे प्रभावी अनुष्ठान आहे
रुद्रसूक्त हे यजुर्वेदातील तैतेरीय संहितेचा भाग आहे. श्री गुरुनी त्यांच्या एका मृत पावलेल्या व्यक्तीला त्याच्या पत्नीचे पतीसेवेच फळ व प्रखर गुरुभक्तीमुळे रुद्र सुक्ताच्या जलाने प्रोक्षण करून जीवनदान दिले असे गुरुचरित्र सांगते. रुद्र देवता रुद्राच्या पठणाने प्रसन्न होते व त्यामुळे भक्ताचे अरिष्ट दूर होते हा अनुभव आहे. याचा लाभ व्हावा म्हणून भाऊ महाराजानी आपल्या शिष्याना रुद्र मंत्र शिकविले व त्या करवी रुद्राभिषेक चालू केला. श्रावणात दर सोमवारी रुद्राभिषेक आयोजित केले जातात तसेच महाशिवरात्री , व अनेक प्रसंगी सर्वच मठात रुद्राभिषेक होत असतात. अनेक भक्तांची अनेक संकटे याने दूर झाली आहेत. श्री दत्तात्रेयांना रुद्र अतिशय प्रिय आहेत. रुद्र पठणाने दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते.