ग्रंथ पठण

पूर्वी भारतात सर्व जनजीवन शेतीवर अवलंबून होत. पेरणी झाल्यानंतर काही काळ विश्रांतीचा असे. याकाळात पावसामुळे इतर काही कामे नसत. या सर्वाचा विचार करून आपल्या पूर्वजांनी हा महिना देवाचे नामस्मरण करण्यासाठी ठरविला. प्रत्येक धर्मात वर्षातील एक महिना देवाच्या नामस्मरणासाठी ठरविलेला आहे. पूर्वी पासून गावागावात सप्ताह, ग्रंथ पठण करण्याची प्रथा आहे. काही वर्षापर्यंत ही प्रथा चालू होती. हळूहळू ही प्रथा कालबाह्य होऊ लागली. भाऊ महाराजानी ही प्रथा शिषयांमध्ये पुनर्जीवित केली. मुंबईकरांना त्याची आवड लावली. श्रावणात घराघरात ग्रंथ पठण करावयास सांगितले. ग्रंथ वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. निरूपण करताना संभाषण कला अवगत होऊ लागते. समोर बसलेल्या लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो. संतांची कृपा प्राप्त होते. घरामध्ये पवित्र स्पंदने जाणवू लागतात. मन त्या कथांमध्ये रंगून जात. वाईट विचारांचा ऱ्हास होऊ लागतो. श्रोता व वक्ता दोन्ही ही ज्ञानी होऊ लागतात. ग्रंथ पठणाच पुण्य लाभत. भाऊ महाराजानी आपल्या शिष्याना भक्ती मध्ये रममाण करण्यासाठी ही प्रथा सुरू केली.