अथर्वशीर्ष सामुदायिक पठण

भाऊ महाराजांनी चिंचपोकळी द. वि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रथम सामुदायिक अथर्वशीर्षच्या सामुदायिक पठणाने गणेश मूर्तीची स्थापना करण्याची सुरवात केली. तेव्हापासून आजतागायत ही प्रथा चालू आहे. सदर मंत्र हे गणपती मंत्र आहेत. ह्याच्या पठणानाने गणेशतत्व जागृत होते. त्यामूळे ह्या मूर्तिपूढे केलेले नवस, प्रार्थना आदी पूर्णत्वास जातात आणि नवसाला पावणारा गणपती अशी ह्या गणपतीची ओळख निर्माण होते. सदर मंत्र वाशिंद येथेही दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवलाही म्हटले जातात. तसेच विविध सेन्टरला, दर संकष्टीलाही ह्याचे सामुदायिक पठण करण्यात येते.

सामुदायिक पठण – चिंचपोकळी द. वि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

सामुदायिक पठण – सेन्टर