वैदिक धर्मा प्रमाणे या सृष्टिच्या पलीकडे ही अनेक सृष्टी आहेत. किंवा अनेक मिती आहेत. आपण त्रिमिती जगात राहतो. या प्रमाणेच पंचमिती, षष्टमीती अशा अनेक मिती या सृष्टीत आहेत, असं वैदिक धर्म मानतो. या विविध सृष्टीना, मितीना त्यांनी लोक अस नाम वापरलं आहे. उदा. विष्णु लोक, शिवलोक. या पैकी पितर लोक हा सुद्धा एक लोक मानला गेला आहे. देहावसान झाल्यावर जीवात्मा शरीरातून वेगळा होतो. त्याचा एक नवीन प्रवास चालू होतो. बाराव, तेराव झालं की या जिवात्म्याला पुढिल गती प्राप्त होते. एका मितीतून दुसर्या मितीतील प्रवास. वर्ष श्राद्ध झाल्यावर त्या पुढील गती प्राप्त होते. काही कारणास्तव या विधी नाही झाल्या, तर आत्मा मध्येच अडकून रहातो. मृत्यू नंतर ही एका नवीन जीवनाची सुरवात झालेली असते. आत्म्याला या जगातही आपल्या पूर्णत्वाकडे प्रवास करायचा असतो. जे आत्मे पुण्यशील असतात त्यांना सहज गती प्राप्त होते. परंतु जिवंत असताना एखाद्या आत्म्याच्या काही वासना अपूर्ण राहिल्या असल्यास, त्या वासना मृत्यू नंतर त्या आत्म्यास पितरलोकात जखडून ठेवतात. बऱ्याचदा हे आत्मे आपल्या वंशजाना नानाप्रकारे त्रास देऊ लागतात. या दोषाला पितरदोष असे म्हणतात. अशा काही दोषनिवारणार्थ सपिंडी, त्रिपिंडी श्राद्ध करावयास सांगितले जाते.
आपल्या पूर्वजांनी या दोषनिवारणार्थ वेगळी व्यवस्था केली आहे. गणपति गेल्यानंतरचा पंधरा दिवसाचा कालखंड या साठी मुक्रर करण्यात आला आहे. या कालखंडात कोणत्याही इतर देवाच पूजन केले जात नाही. या कालावधीत विविध उपचारांनी पितरांना संतुष्ट केले जाते. आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे चतुर्मिती मध्ये असलेल्या या आत्म्यांना कोणतीही गोष्ट ग्रहण करता येत नाही, चव घेता येत नाही. परंतु ते एखाद्या पदार्थाचा सुगंध घेऊ शकतात. मनुष्याने आयुष्यभर किती ही खाल्लं तरी अन्नावरील वासना त्याची कधीही पूर्ण होत नाही. या कारणास्तव पितराना त्यांच्या आवडीचे पदार्थ दाखविले जातात. आपण त्याला वाड़ी दाखवणे अस म्हणतो. सदगुरु भाऊ महाराजांनी या बाबतीत एक अभिनव कल्पना अस्तित्वात आणली. पितरांच्या नावाने त्याच्या तिथिला गाणगापुर येथे दत्तभकतांसाठी अन्नदान सुरु केल. ज्या मृत व्यक्तीच्या नावाने संकल्प करून अन्नदान केल जात. त्या व्यक्तिचा आत्मा तिथे हजर राहतो. त्या निमित्ताने त्या आत्म्याला दत्तभूमित प्रवेश मिळतो व अनुषंगाने दत्त कृपा प्राप्त होते. सद्गति प्राप्त होते. या गोष्टिचा आणखि एक फायदा होतो. पितर संतुष्ट झाल्याने त्यांच्या असंतुष्टतेमुळे वंशजाना होणारे त्रास आपोआपच दूर होतात. मानव एका अकल्पित त्रासातुन मुक्त होतो. कित्येक पित्तरानी आपल्या वंशजाना स्वप्नात जावून त्या बद्दल संतुष्टता व्यक्त केली आहे.
भाऊ महाराजांनी आपल्या शिष्यांचे विविध कारणांनी होणारे त्रास दूर करण्यासाठी केलेली एक अभिनव योजना होती.