अक्षय माधुकरी योजना (गाणगापूर)

दत्त महाराजांना माधुकरी मागणे आणि वाढणे दोन्हीं प्रिय आहे .आपण नेहमीच अस पाहतो की काही संप्रदायी प्रथम एखाद्या मठाची निर्मिती करतात, हळूहळू त्यांच्या कडे भाविकांचा ओघ वाढू लागतो. हे औत्सुक्याच लक्षण असते. खरे संत आपल्या विचारांनी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणत असतात. त्यांच्या श्रेष्ठत्वाची कल्पना आल्यावर आपोआपच भाविक संतांच्या चरणाशी येतात. असच काहीसं भाऊ महाराजांच्या बाबतीत झालं. साधनेच्या अनुषंगाने अनेक भाविक भाऊंच्या जवळ येऊ लागले. आपलं कार्य एवढं मोठं असायला हवं त्या साठी मठाची गरज भासावी. दत्तभक्तीची अनेक अंगे शिकवण्यासाठी एखाद पवित्र स्थान असणे गरजेचे होते. धर्मशाळेत साधना शिकवू शकत नाही. या कारणास्तव भाऊंनी गाणगापूरच्या मठाच्या उभारणीचें  कार्य हाती घेतल. आपल्या संचितातील काही भाग स्वछ करण्यासाठी आपल्या घामाचा पैसा देवकार्यासाठी लागणे गरजेचे आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. संस्थेतर्फे दररोज पालखी रस्त्याने जाणाऱ्या भाविकांना माधुकरी मिळावी या उद्देशाने भाऊंनी अक्षय माधुकरी योजना सुरू केली.

या योजने अंतर्गत जी व्यक्ती भाग घेईल त्याच्या नावे, गाणगापूरी दत्त भक्तांना, वर्षातून एक दिवस अमर्यादित कालखंडासाठी माधुकरी वाढली जाईल. त्या काळी गाव सोडल्यावर संगमापर्यंत भाऊ महाराज मठ सोडता एकही मठ नव्हता. या मधल्या गात माधुकरी मिळत नसे. कोणी ही दत्तभक्त उपाशी राहू नये हा मूळ उद्देश्य. संकल्पना सर्वाना आवडली. बरेच सभासद गोळा झाले. एका अभिनव योजनेची सुरवात झाली. दत्तक्षेत्रात येणाऱ्या भक्तांना एकवेळचे पोटभर जेवण मिळू लागले. आजही मठातर्फे रोज दुपारी सर्व भक्तांना माधुकरी वाढली जाते. आजही अनेक शिष्य ह्या योजनेत नित्य सहभागी होतात.