लहान मूल शिकत असताना मोठया माणसांकडे पहात मोठी होत असतात. त्यांचे बरे वाईट गुण आपल्या स्वतः मध्ये उतरवत असतात. सामाजिक मन ही बऱ्याच अंशी असच असते. समाजात वावरणाऱ्या एखाद्या थोर व्यक्तीला आपण आपल्यामध्ये प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करीत असतो. समाजत आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टींचा परिणाम प्रत्येक मानवी मनावर होत असतो. थोर समाज प्रवर्तक आपल्या कृतीतून समाजाला दिशा देण्याचे काम करीत असतात. त्यांनी केलेल्या उतुंग कार्याकडे पाहण्यापेक्षा त्यातून मिळणाऱ्या संदेशाकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे ठरते. सद्गुरू भाऊ महाराजांनी परमार्थाबरोबर समाजकार्याचा अखंड तेवणारा दिवा आपल्या शिष्यांच्या हाती सुपूर्द केला. परमार्थ करीत असताना आपण समाजापासून वेगळे राहू शकत नाही. हा स्वयंकेंद्रितपणा ठरू शकतो. जो आध्यात्मिक साधनेसाठी उपयोगाचा नाही. समाजातील उणिवा, दुःख, परवड जर मनाला डाचत नसेल, तर आपलं मन साधनेसाठी अजून तयार नाही असे समजावे. एकदा भाऊ महाराज शिष्यांसोबत गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता एक गोष्ट ते सहज बोलून गेले. त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना पुढील वाटचाली संबधी दोन पर्याय दिले होते. एक म्हणजे समाजापासून अलिप्त राहून साधनेत निमग्न व्हायचे. दुसरा पर्याय म्हणजे लोकांमध्ये राहूनच,आपलं वेगळेपण न जपता साधना करायची. भाऊंनी दुसरा पर्याय निवडला. पुढे जाऊन एवढ्या शिष्यांचा भार वाहणारी माऊली लोकांपासून वेगळी कशी राहू शकेल. दुखीतांची दुःख दूर करण्यासाठी भाऊंचा जन्म झाला होता. आपल्या जीवन कार्यात हजारो लोकांची दुःख त्यांनी निवारण केली. कित्येकांचे संसार उभे केले. अनेकांना आधार दिला. आणि हाच विचार त्यांनी शिष्यांमध्ये रुजवला…

करता करविता भगवंत । आपण फक्त निमित्तमात्र। सद्गुरूच आपल्या शिष्यांकडून यथायोग्य कार्य करवून घेत असतात. शिष्यानीही या गोष्टीला सर आखोपर ठेवलं. समाजिक कार्य करताना आपल्याला जे आवडते, त्याच कार्यात जर आपण सेवा करीत असू तर हे हेतुपरस्सर कार्य ठरू शकते. समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या बाबतीत आपल्याला तितकेच दक्ष असायला हवे. सेवा हा शब्द कोणत्याही एखाद दुसऱ्या गोष्टीत बांधू शकत नाही. जे जे दिसे भूत। ते ते माने भगवंत। या माऊलीच्या ओवी प्रमाणे सामाजिक भान असायले हवे. गाणगापुरला पायवाटेवर पाणपोई बांधून सामाजिक आपुलकीचा धड़ा घालून दिला. समाज कार्यात सेवा करीत असताना अनेक विविध कार्ये माऊलीने आपल्या शिष्यांकरवी करवून घेतली.
डहाणू, कोसबाड येथे असलेल्या आश्रम शाळेत संस्थेतर्फे दर महिन्याला मेडिकल कॅम्प चालू केल्यावर एक गोष्ट लक्षात आली. वातावरण थंड, व त्यात थंड पाण्याने पहाटे आंघोळ करावी लागत असल्याने सर्दी आणि ताप याच प्रमाण वाढलं होत. प्रतिकार शक्ती कमी झाली होती. संस्थेतर्फे शाळेला २००० लिटरच सोलर वॉटर हीटर देण्यात आला. मुलांना सकाळी गरम पाणी मिळू लागले.
https://www.facebook.com/740236679436897/posts/1378825038911388/
लोणावळा परिसरात सेवा सुरु केल्यावर वनहाटी गावाची माहिती मिळाली. ७० वर्षे स्वातंत्र्य मिळूनही अजून गावात लाईट पोहचली नव्हती. एका दिवसात सोलर पैनल लावून घराघरात लाईट पोहचविली. ७० वर्षानी संध्याकाळी प्रत्येक घर उजळली.
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2539741346314470/
२०१९ च्या महापुरात अनेक गावे वाहुन गेली. कित्येक गावांचा संपर्क तूटला होता. चिपळून कराड मार्गावर डोंगरात असलेल्या एका गावाचा संपर्क तूटला होता. मध्ये असलेल धरण वाहून गेल होत. त्यांची गुजराण दुधावर होत असे. गावात जाऊन दूध न विकता आल्याने त्यांची उपासमार चालू झाली होती. माहिती मिळाल्यावर भाऊंचे कार्यकर्त तेथे टेम्पोने धान्याचे पैकेट बनवून घेऊन गेले. डोंगर पार करुन गावात पोहचायला तीन तास लागले. परंतु अडकलेल्याना, आपल्या जीवनावश्यक वस्तु पोहचविल्याचा आनंद कशात मोजण्यासरखा नव्हता.
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2514897368798868/
भाऊ महाराजानी दिलेले निष्काम सेवेचे विचार आजही त्याच गतीने पाझरत आहेत.