शैक्षणिक मदत

एकदा एका गुन्हेगाराला इंग्रज गावतुन पकड़ून नेत होते. खरतर त्या क्रांतीकारकाने देशसाठी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारल होत. परंतु शिक्षणा अभावी लोकांना जगाच राजकारण समजत नव्हते. इंग्रज त्याला नेत असताना गावातील लोक हजारोच्या संख्येने जमले होते व त्याच्यावर दगड मारत होते. एका सैनिकाने आपल्या ब्रिगेडियरला या बाबतीत विचारले असता तो म्हणाला. “या देशात शिक्षणाचा अभाव असल्याने त्याना आपल कोण आणि परक कोण हेच कळत नाही आहे. नाहीतर हा उचललेला दगड आपल्या विरोधात असता तर आपल्याला देश सोडावा लागला असता”. जोतिबा फुले, रानडे, कर्मवीर भाऊराव पाटिल इत्यादी मंडळीनी शिक्षणाचा पुरस्कार केला नसता तर आणखी काही वर्ष स्वातंत्र्य मिळाल नसत. चर्चिल आणखी काही वर्ष स्वातंत्र्य देण्यास तयार नव्हतां. कारण त्याच म्हणण होत की, अजुनही भारत स्वतंत्र भोगण्यास पात्र नाही आहे. तस झाल्यास भारतात दंगे होतिल. आणि तसच झाल. दुर्दैवाने सत्तर वर्षानंतरही अजुन काही राज्यातील दुर्गम भागात शिक्षण पोहचले नाही. शिक्षणाची एकसंघ पद्धत नाही आहे. आदिवासी भागात अजुन ही शिक्षणाची वाणवा आहे. जे शिक्षण दिले जाते आहे, ते २५ वर्षापूर्वी उपयोगी पडणार आहे. शैक्षणिक सुविधा पोहचत नाही आहे. दुर्गम भागातील लोकांना जगातील घडामोडी बद्दल काही माहिती नाही.

भाऊ आपल्या सहकारी शिष्यांशी बोलताना भारतातील समाजकारणावर प्रकाश टाक़त असत. इतिहास संशोधनासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक भाग त्यानी पायी तुडवला असल्याने, ग्रामीण भागातील अव्यवस्थेची त्याना चांगली जाण होती. वाशिंद मठाच्या निर्मिति नंतर आजुबाजुच्या पाड्यातील मुलाना शैक्षणिक साहित्य पूरविण्याचे कार्य केले. खेळामध्ये प्राविण्य मिळावं म्हणून काही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आपसूकच हा वारसा भाऊंच्या शिष्याकडे आला. भाऊ महाराजांकडून समाजसेवेचा वसा घेऊन निर्माण झालेल्या श्री भाऊ मेडीकल संस्थे तर्फे दुर्गम, दुर्लक्षित भागात राहणाऱ्या मुलांसाठी शैक्षणीक सुवीधा पुरविण्याचे कार्य हाती घेण्यात आल. माळशेज घाट, वाडा, मोखाडा, डहाणू या विभागातील विद्यार्थ्याना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले. पण हे काम आजकाल बऱ्याच संस्था करतात. पूढील आयुष्यासाठी लागू पडेल असे शिक्षण महत्वाचे. माळशेज घाट, वाडा व डहाणू येथील  विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्यासाठी संगणक कक्ष बनविण्यात आले. ज्यामध्ये एकाच वेळी १० विद्यार्थी संगणकाचे शिक्षण घेऊ शकतात. तसेच खंडाळा, लोणावळा या विभागातील अनेक जि. प. शाळांना संगणक देण्यात आला. मुलांना e-learning च शिक्षण मिळावे या साठी प्रयत्न करण्यात आले. काही इतर सामाजिक संस्थाना बरोबर घेऊन दुर्गम भागातील जास्तीतजास्त मुलांना वर्षभरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले. उदा. रेनकोट, स्वेटर, चप्पल, बॅग. इ. कारण वह्या पुस्तकं वाटली जातात पण काही ठिकाणी इतकी गरिबी आहे की मुलांच्या पायात चप्पल नसते, रेनकोट नसतो, थंडीपासून बचाव व्हावा म्हणून स्वेटर नसते. या लक्षात न येणाऱ्या गोष्टीकडेही संस्थेने लक्ष केंद्रित केले. याच एक कारण म्हणजे भाऊ महाराजांची शिकवण.

https://www.facebook.com/740236679436897/posts/1378825038911388/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1199392250188002/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1815004101960144/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2651888018433135/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2639570856331518/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2668790926742844/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2662737017348235/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2529999917288613/