भाऊ महाराज वाढदिवस, जयंती आणि पुण्यस्मरण

भाऊंचा 70वा वाढदिवस

भाऊ महाराज जयंती उत्सव

पूर्णानंद स्वामींची समाधी असलेल्या गोळवण गावी, नाथांच्या पुण्य भूमीत भानुदास नामक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वावरत होते. त्यांना दोन मुले, पांडुरंग आणि तुकाराम. दोघांचंही लग्न झाली. पांडुरंगाला तीन मुले झाली. काशीराम, रावजी (तात्या) आणि रामचंद्र. तुकारामाला मूळ बाळ नव्हते. रावजींचा (तात्या) जन्म १५ जुलै १९०८ साली झाला. तुकारामांनी त्याला दत्तक घेतलं. पुढे रीतसर त्यांनी सरकारी नियमानुसार कागदपत्रे तयार केली आणि रावजी, वामन तुकाराम गावडे झाले. तात्या हे आजोबांच्या (भानुदास) वळणावर गेले होते. आजोबांनी नाथपंथी गुरु केले होते. त्यांच्याकडून दत्तभक्तीचा ठसा त्यांचेवर उमठला होता. ती दत्तभक्ती तात्यांजवळ आली होती. तात्या आता उपवर होत आले होते. मुलगी पाहिली, पेंडुर गावच्या मोगरणे वाडीची, शंकर गावडेंची चंद्रा नामक! १७ मार्च १९२९ साली वयाच्या २१ व्या वर्षी तात्या विवाहबद्ध झाले. शके १८५४ माघ शुद्ध षष्टी, १९३३ साल, जानेवारी महिना ३१ तारीख ! तात्यांच्या अंगणात सावळ्या रंगाचं बाळ जन्माला आल. त्याच नाव ठेवण्यात आलं तेही आजोबांचं, भानुदास ! नाथांच्या भूमीत, चिमुकल्या नाथाने जन्म घेतला. हाच दिवस दरवर्षी भाऊंची जयंती उत्सव म्हणून सर्व शिष्यांतर्फे खूप आनंदाने आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो.

वाशिंद मठ

गाणगापूर मठ

भाऊ महाराज पुण्यस्मरण

आणि अचानक एके दिवशी दत्तप्रभूंचा संदेश मिळाला, तुझं देहधारी कार्य संपलेलं आहे, निघायची तयारी कर ! दत्तप्रभूंचे प्रत्येक कार्य त्यांच्याच सूचनेनुसार भाऊराया करीत आले होते. मग ‘निघायची तयारी कर’ हा संदेश ते कसे डावलतील? एक छोटीशी उलटी त्यांना झाली, बस ! तेच निमित्त साधून भाऊनाथानी आपला दत्तभक्तीचा प्रवास त्यांच्याच सूचनेनुसार थांबवला आणि कार्तिक कृष्ण द्वितीया शके १९२६, सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर २००४ या पवित्र दिनी श्री दत्तात्रेयांच्या चरणी विसावा घेतला. हा दिवस दरवर्षी पुण्यस्मरण म्ह्णून शिष्यपरिवारातर्फे स्मरण केला जातो. काकाश्रींकडून यादिवशी समाधीसमोर यतीराधना केली जाते. अन्नदान केलं जातं.

समाधी मंदिर

भाऊंनी आपली अंतिम इच्छा सांगीतली होती की, आपल्या देहाला अग्नी देऊ नका, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरापाशी धरणीमातेच्या उदरात माझा देह ठेऊन त्यावर समाधी मंदिर बांधा. त्याप्रमाणे भाऊंचा देह सालंकृत करून वेदघोषात, नियोजित (श्रीकृष्ण मंदिराच्या मागे जेथे आयताकृती जमीन खोदून ठेवली होती) त्या जागेवर नेण्यात आला. बाकीचे सर्व सोपस्कार झाल्यावर, काकाश्रीनी व बाबांनी आणि इतर शिष्यानी भाऊंचा देह धरणीमातेच्या उदरात ठेवला. अश्रूभरीत नयनांनी सर्वांनी भाऊंचे अंतिम दर्शन घेतले. त्यावरच पुढे समाधी मंदिर बांधण्यात आले. त्यासमोर सभागृह उभारण्यात आले. आता मठातले सर्व कार्यक्रम समाधी मंदिरात केले जातात.

भाऊंच्या जयंतीनिमित्त शिष्यांकडुन विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

सद्गुरु भाऊ महाराज यांच्या ८५व्या जयंती निमीत्ताने मिठाई वाटप
https://www.facebook.com/740236679436897/posts/1863970920396795/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1863970920396795/

https://www.facebook.com/740236679436897/posts/1863970920396795/

सद्गुरु भाऊ महाराज यांच्या ८६व्या जयंती निमीत्ताने दि. ३१ जाने. २०१९, गुरुवार, या दिवशी खंडाळा घाटातील दुर्गम जंगल विभागातिल ‘नागनाथ’ ता. खालापुर, या गावातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तसेच प्रीति भोजन ही देण्यात आले
https://www.facebook.com/740236679436897/posts/1862910593836161/

https://www.facebook.com/740236679436897/posts/1862910593836161/

श्री भाऊ महाराज ह्यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त कोळवाडी आश्रम शाळा, पिंपळजोगा, जुन्नर येथील ४०० निरागस लहान मुलांना मिठाई वाटप.

https://www.facebook.com/2409646245990648/posts/2656817087940228/

https://www.facebook.com/2409646245990648/posts/2656817087940228/