इतर प्रकाशने

An Avatar of Luminary - भाऊंच्या चरित्राचे इंग्रजीत रूपांतर

गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. सर्व भारतभर गुरुप्रीत्यर्थ साजरी केली जाते. ज्यांनी महाभारत, भागवत, पुराणे लिहिली. तसेच वेदांचे संहितीकरण केले. त्या श्रेष्ठ आचार्य व्यासांचे पूजन या दिनी करण्याची प्रथा आहे. म्हणूनच याला ‘व्यास पौर्णिमा’ म्हणतात. व्यास पौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ असें म्हणून त्यांना प्रथम वंदन केले जाते. व्यासांच्या रूपात महाविष्णू यांनी अवतार घेतला होता असे मानले जाते. व्यासपूजनाच्या अनुषंगाने गुरुतत्त्वाचे पूजन केले जाते. ‘नास्ति तत्वं गुरो परम’. गुरुतत्त्वा इतके श्रेष्ठ तत्व जगात दूसरे कोणतेही नाही. म्हणूनच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. यावेळेच्या गुरुपौर्णिमेला श्री. अमेय चव्हाण यांनी भाऊंच्या चरित्राचे प्रथमच इंग्रजित रूपांतर करून – An Avatar of Luminary – हे एक छोटेखानी पुस्तक सद्गुरू चरणी अर्पण केले.

www.BhauMaharaj.com - संकेतस्थळ
संस्थाची प्रकाशने

भाऊ महाराजनिर्मित, सदगुरु श्री भालचंद्र महाराज सेवाश्रम, मुंबई (रजि.) या संस्थेच्या अंतर्गत अनेक प्रकाशने भाऊ महाराज शिष्य परिवारातर्फे प्रकाशित केली जातात. दरवर्षी ‘गुरू गौरव’ हा दसरा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. यातील काही अंकाचे फोटो खाली दिलेले आहेत. ही सर्व लेखन संपदा दत्तभक्ती संबधित आहे. तरी इच्छुक भक्तांनी याच्या उपलब्धतेसाठी संस्थेशी संपर्क साधावा.