
सद्गुरू श्री भालचंद्र महाराज सेवाश्रम (रजि.), मुंबई
कार्यालय : १०/७२३, म. हौ. बोर्ड, अभ्युदयनगर, काळाचौकी, मुं. ३३. मो. : ९८१९२२०२०४. संस्थेचे कार्य – या संस्थेची स्थापना सद्गुरु भाऊ महाराजानी १९८५ साली केली. ही संस्था मुंबई करिता कार्यरत आहे. या संस्थेतर्फे दत्तभक्ती प्रचारार्थ, विविध केंद्रा मार्फत, मंत्र प्रशिक्षण,पारायण आयोजन, सामुदायिक दत्त याग, आध्यात्मिक प्रकाशने, दत्तस्थान यात्रा आयोजित केली जातात.
सद्गुरू भाऊ महाराज धर्मदाय संस्था (सार्व) रजि. ( देवल गाणगापूर)

कार्यालय : ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक राज्य. संपर्क : ०८४७०-२७४३७४. सद्गुरू भाऊ महाराज यांनी सदर संस्थेची स्थापना १९९४ साली केली . सद्गुरू भालचंद्र महाराज उपासना मठाची वास्तू उभारली.

- या मठामध्ये संस्थे तर्फे श्रीगुरूचरित्र पारायण, अखंड नंदादिप, माधुकरी, अक्षय माधुकरी, महामृत्युंजय जप, धन्वंतरी जप, राहू-केतू चे जप केले जातात.
- माघी अन्नदानाचा सर्वात मोठा कार्यक्रम येथे दरवर्षी माघ पौर्णिमे निमित्त सलग सात दिवस आयोजित केला जातो. हजारो भाविक याचा लाभ घेतात. सर्व शिष्य वर्ग या सेवेत सहभागी होतात.
- दीपावलीला या ठिकाणी अष्टतीर्थ यात्रा, गुरुचरित्र पारायण, धन्वंतरी याग, भजन सेवा, भाऊबीज इ. कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दररोज मठात यात्रेकरू व भाविकांसाठी माधुकरी वाढली जाते.
- पितृपंधरवडा या कालावधीत यात्रेकरुंसाठी सलग पंधरा दिवस अन्नदान केले जाते.
- दत्तजयंतीला हजारो भाविकांना चहा वाटप केले जाते.
श्री भानुदास प्रतिष्ठान, नृसिंहवाडी

कार्यालय : नरसोबावाडी एस. टी. स्टँन्ड जवळ, नरसोबावाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर – संपर्क : ०२३२२-२७०२००. संस्थेची स्थापना २००२ साली सदगुरु भाऊ महाराजानी केली. संस्थेचे कार्य – सदर संस्थेची या ठिकाणी दुमजली इमारत असून या ठिकाणी लग्न, मुंज, साखरपुडा, यज्ञ-याग, पुजा अर्चा यासाठी आदर्श वास्तु. अभिषेक, लघुरूद्र, महारूद्र, नारायण नागबळी विधी, कालसर्प योगशांती, त्रिपिंडी श्राध्द इ. धार्मिक विधी केले जातात.
- या सुंदर वास्तू मध्ये संस्थेतर्फे मे महीन्यात सात दिवसांचा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो.
- या कार्यक्रमात गुरुचरित्र पारायण, साई सतचरित्र पारायण, भजन सेवा, दत्त याग, दिपाराधना इ. कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच वाडीतील रहिवासी व शिष्य वर्गासाठी नृत्य स्पर्धा आयोजित केली जाते.
श्री भाऊ महाराज सहकारी गृहनिर्माण संकुल वाशिंद . स्थापना – १९९९
कार्यालय : दहागांव, वाशिंद, ता. शहापूर, जि. ठाणे. दुरध्वनी : ८९७६२९२९६०. संस्थेचे कार्य – प्रदुषणमुक्त वातावरणात उत्कृष्ट घरकुलांसाठी अवश्य संपर्क साधावा
भाऊ महाराज उपासना मठ स्थापना – १९९८

कार्यालय : श्री दत्त मंदिर, देसलेपाडा, वाशिंद, दहागांव, ता. शहापूर, जि. ठाणे. – मो. ८००७०४६१८१. संस्थेचे कार्य – सदगुरु भाऊ महाराजानी या क्षेत्री दत्त मंदिर, गणेश मंदिर, शिव मंदिर, देवी मंदिर, कृष्ण मंदिर, शनी मंदिर, इ. मंदिराची उभारणी केली.
- दर गुरुवारी पालखी सोहळा संपन्न होतो.
- पालखी नैवेद्य सेवा, गुरूपादुका रूद्राभिषेक, अन्नदान, अखंड नंदादीप, संकष्टी व शनि अभिषेक इ. धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- सद्गुरू भाऊ महाराज, यांची समाधी येथेच आहे. दर रविवारी समाधी मंदिरात रुद्राभिषेक केला जातो.
- चंडीहोम, नवचंडी होम, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, भाऊ महाराज जयंती, भाऊ महाराज पुण्यस्मरण, गणेशोत्सव इ. उत्सव साजरे केले जातात.
- मे महिन्यात सलग २१ दिवस अखंड नामघोष, अखंड वीणा वादन, हरीभजनाचे सप्ताह आयोजित केले जातात.
श्री भानुदास सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई स्थापना – १९९६
कार्यालय : शॉप नं. ३, श्रीकृपा बिल्डिंग, रंगारी बदकचाळ, चिंचपोकळी, मुंबई – ४०००१२. मो. ८१०८८८६२६१
- विविध आकर्षक ठेव योजना
- विविध कर्ज
- दामदुप्पट योजना
- यात्रा-सहल योजना
सद्गुरू श्रीभाऊ महाराज सेवाश्रम धर्मदाय संस्था (रजि.) स्थापना २००६
कार्यालय : श्रीक्षेत्र मु. पो. नेरूर (भाक्राड), वाघोसेवाडी रोड, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. मो. ९२७०४५८५१७. संस्थेचे कार्य – या संस्थेची स्थापना सदगुरु भाऊ महाराज यांचे उत्तराधिकारी श्री काका महाराज यांनी केली. गोग्रास, महाप्रसाद, अखंड नंदादीप, रूद्राभिषेक केले जातात.
श्री भाऊ मेडिकल अन्ड एज्युकेशनल ट्रस्ट (रजि.) स्थापना – २०१३

कार्यालय : क/९८, अमरदिप, द. लाड मार्ग, चिंचपोकळी, मुंबई – ३३. संपर्क : ९८६७२५१९०८. संस्थेचे कार्य – आदिवासी पाडे तसेच, दुर्गम भागातील गरजूंसाठी मोफत वैद्यकिय सेवा, तसेच गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, औषधे वाटप. संगणक कक्ष, मोतीबिंदू ऑपरेशन, सोलार वॉटर हिटर, सोलार लाईट, समुपदेशन, इ. सेवा देण्यात येतात. कार्यक्षेत्र – माळशेज घाट, वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू, लोणावळा, खंडाळा, नर्मदा नदी वनवासी क्षेत्र.
श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा चॅरिटेबल ट्रस्ट

कार्यालय : १७/बी, उदयश्री सोसायटी, माऊली निवास,भांडुप (पूर्व), मुंबई. संस्थेचे कार्य – दर वर्षी माघ पौर्णिमेनिमित्त वाशिंद ते गाणगापूर पालखी परिक्रमा आयोजित केली जाते. तसेच दर पाच वर्षांनी पायी पालखी परिक्रमेचे आयोजन केले जाते. या मार्गावर असलेल्या दुर्गम भागातील गावात आरोग्य शिबीर, शैक्षणिक साहित्य पुरविले जाते.