
सद्यस्थितीमध्ये, मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस खूप गतीमान आयुष्य जगत आहे. घड्याळच्या काट्याबरोबर त्याने स्वतःला बांधून घेतले आहे. ज्या पोटासाठी आणि आपल्या मुला-बाळांसाठी तो एवढी वणवण करतो. त्यांच्या सोबत बसून तो साधे चार घास खाऊ शकत नाही. मग तो त्या दयाळू परमेश्वराचे आभार, त्याचे गुणगान कसे करणार?; त्याची आठवण फक्त त्याला अडचणीत होऊ लागते. सोयीस्करपणे, अडचणी प्रसंगे तो त्याला आळवतो. आणि नंतर परत बाजूला सारतो. जरी एखाद्याला त्याची रोज भक्ती करावीशी वाटली तरी, पुनः जागेचा, शांततेचा, प्रसन्न वातावरणचा प्रश्न निर्माण होतो.
चिंतन शिलता एकाग्रतेसाठी । मठ स्थापिले गाणगापूरी, वाशिंदी । मठ महंती होणे मठाधिपती । उद्देश नाही भाऊंचा ।।
भाऊ आजोबानी ही परिस्थिती पाहून, आपल्या शिष्यवर्गासाठी विवीध मठांची निर्मिती केली. जेणेकरून सर्वजण एकत्र येऊन, सामुदायिकरित्या काही नित्योपासना, पारायण सेवा, अन्नदान सेवा इ. करू शकतील. तशी व्यवस्था निर्माण केली. निसर्ग सानिध्य मिळण्यासाठी विविध फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पतींची, मठामध्ये लागवड केली. ज्यामुळे वातावरण सदा प्रफुल्लित राहते.
मन हे वैश्विक शक्तीचे । शिवपार्वती, मायवृत्त, चैतन्याचे । अधिष्ठान केंद्र संपादनाचे । ते घडविणे हा हेतू ।।
स्थान महिमा लक्षात घेऊन, श्री दत्त क्षेत्री सुद्धा मठ उभारणी केली गेली. जेणेकरून वर्षातून किमान एकदा तरी तो त्या मूळ स्थानात जाऊन दत्तचरणी लीन होऊन त्यांची क्षमायाचना करेल. त्याचे गुणगान करेल. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपले आयुष्य आनंदाने पार पाडेल.
व्यक्तीमत्व विकास व्हावया । मनाची घडण आहे पाया । ईश्वरी उपासना करी उपाया । मन:शक्तीचे एकत्रीकरण ।।
सदर मठ घडवताना कित्येक शिष्य घडले. काही खूप मोठ्या उंचीवर पोहचले. तर काही अर्ध्या रस्त्यावर माघारी फिरते झाले. पण भाऊ थांबले नाहीत. जे सोबत आले त्यांना घेऊन ते चालत राहिले. भाऊ सांगायचे, मी पेरत जातो, जिथे जमीन कसदार असेल तिथे ते नक्कीच रुजेल. मठाच्या निर्मिती बाबत भाऊंचा एक ठोस विचार होता. भाऊंनी निर्माण केलेल्या खालील वास्तू केवळ मठ नसून, त्यांच्या शिष्यांसाठी तयार केलेलं हक्काचे घर आहे. त्यांच्या कितीतरी भावी पिढ्या येथे येऊन दत्तचरणी आपली सेवा रुजू करतील. त्यांचे जीवन दत्तमय होईल. त्यांच्याही आयुष्यात कस्तुरीगंध दरवळेल. आणि अनायसे भाऊंनी दत्तभक्तीशी मारलेली गाठ, अजून घट्ट होत राहील. सदगुरु भाऊ महाराजांचे उत्तराधिकारी काका महाराज (श्री. विजय सि. चव्हाण) हे तीच पताका पुढे नेत आहेत.
गाणगापूर मठ

वाशिंद मठ

नृसिंहवाडी मठ

कुडाळ मठ

|| श्री गुरुदेव दत्त ||