
दत्तभक्तिच बीज रुजवण्यासाठी अनेक संतांनी मोलाच कार्य केल आहे. अनेक संतचरित्रकरानी यात अधिकच भर घातली आहे. दत्त प्रबोध, दत्तमहात्म्य, श्री गुरुचरित्र अशा अनेक महान ग्रंथाचीं निर्मिति यातूनच झाली आहे. समाजाला खऱ्या भक्तिच स्वरूप कळावे व त्यानुसार मार्गक्रमणा व्हावी, हाच मूळ हेतु त्यामागे होता. दत्तभक्ति प्रसारासाठी भाऊं महाराजांनी क्रांतिकारक पाऊल टाकल. मराठे गुरुजी व पी. अण्णा स्वामी यांच्या आशीर्वादाने भाऊ महाराजांनी भगवान श्री कॄष्णाची लोप पावलेली सहजोग साधना पुनर्जीवित केली. आजचा समाज आजचे जीवन अशा वळणावर आहे की साधना हा शब्द लोकांपासून कोसो दूर आहे. तसेच ‘दत्तभक्ति कठिण आहे ,सामान्य माणसाला जमणार नाही’ असा समज प्रचलित आहे. या धकाधकीच्या जीवनातही सामान्य मानवाला सहज जमेल अस साधनेच स्वरूप भाऊनी निर्माण केल.



साधना करण्यापेक्षा साधना झाली पाहिजे हे भाऊंच मूळ तत्वज्ञान होत. यासाठी त्यानी गाणगापुर, नृसिंह वाडी ,वाशिंद या क्षेत्री मठाची निर्मिती केली. तरुणाना जवळ करुन येणाऱ्या काळात टिकून राहण्यासाठी साधना किती महत्वाची आहे हे पटवून दिल. भौतिक ज्ञानच्या जोडीने आध्यात्मिक ज्ञानाची ओळख करुन दिली. साधनेच्या प्रत्येक अंगाच अनन्य महत्व कृतीतून अनुभवास दिल.
भाऊंचा वारसा….!!!!!

आजही सदगुरु भाऊ महाराजांचे उत्तराधिकारी काका महाराज (श्री.विजय सि. चव्हाण) हे तीच पताका पुढे नेत आहेत. कोकणातही दत्त भक्तिचा प्रसार व्हावा ही भाऊंची खुप इच्छा होती. या प्रसार कार्या साठी दोन वेळा कोकणात दौरा आयोजित केला गेला होता. गाणगापुर मठाची पूर्ण जबाबदारी भाऊनी काकाश्री यांच्या खांद्यावर टाकली होती. एकदा संगमावर असताना काकाश्रीना एका अनोळखी मातेच्या मुख़ातून तू कोकणात काम कर अशी आज्ञा मिळाली. आज्ञा शिरसावंद्य मानून काकाश्री कामाला लागले. कित्येक महीने या कार्यासाठी एकटेच फिरत होते. योगायोगाने हवी तशी जागा कुडाळ जिल्ह्यातील हुमरमळा या गावी मिळाली.
कुडाळ मठाची निर्मिती….!!!!!







एका मनाने श्रीमंत असणाऱ्या शिष्याने ती जागा दत्तभक्तीच्या कार्यासाठी गुरु चरणी अर्पण केली. २००६ साली सदगुरु भाऊ महाराज सेवाश्रम या संस्थेची स्थापना झाली. काकाश्रीनी या नवीन कार्यासाठी पूर्ण झोकुन दिल. झाड़ाफुलानी भरलेल्या जागेत एक जून घर होत. त्याच रूपांतर मठाच्या इमारतीत करण्यात आल. नवनिर्मितिसाठी अनेक शिष्य कुडाळला जाऊ लागले. घर नव्याने शाकारण्यात आल. सेवेसाठी आलेल्या भक्तांच्या सोईसाठी हे बांधकाम करण्यात आल होत. मठासमोर छोटेखानी सुंदर, सुबक दत्त पादुका मंदिर उभ राहिल. काकाश्री स्वत: न थकता अखंडपणे काम करत असत. गो सेवा करण्याच्या दृष्टीने मोठा गोठा बांधण्यात आला. कोणी भक्ताने दिलेली, कोणी भेट दिलेल्या, विकत घेतलेल्या अनेक गाई आणि त्यांची पाडस आज सुखेनैव रहात आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी काही गडी माणस ठेवण्यात आली आहेत. जमीनीत पूर्वी पासून काही झाड होती. त्याबरोबर आणखी काही झाड लावून निसर्गाच्या सौदर्यात भर घालण्यात आली. मुंबई वरून व इतर ठिकाणाहून येणाऱ्या भक्तांसाठी सुंदर अस भक्तनिवास बांधण्यात आल आहे.

भाऊ महाराज्यांच्या साधनेचा दंडक इथेही तसाच चालू ठेवण्यात आला आहे. दररोज पहाटे दत्त पादुकांवर रुद्राभिषेक व इतर उपचार होतात. सायंकाळी नामघोष, आरती, भजन प्रसाद सेवा असते. नित्य पारायण सेवा ही चालू असते. आजूबाजूच्या तीन देवस्थानात आठवड्यातील तीन दिवस भक्तांना प्रसाद वाटला जातो. परिसरातील अनेक गावांत अथर्वशीर्ष, गुरुगीता या मंत्राचे प्रशिक्षण दिले जाते. साधनेतील योग्य मार्गाचे शिक्षण देऊन मानवातून मनुष्य घडविणे व मानवी जीवन सुसंस्कारित करणे हे काकाश्रींचे ब्रीद आहे. निसर्गाचे पूजन करून त्याला मानवी जीवनासाठी सहाय्यभूत करणे, अनाथांना मायेची ऊब देणे, वृद्धाना प्रेमाचा आधार देणे. गरीब गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, आजारी व्यक्तींना वैद्यकीय सेवा पुरविणे, भुकेलेल्याला अन्न देणे. म्हणजेच ईश्वराला जे जे प्रिय आहे ते ते करणे या संस्थेच मूळ उद्दीष्ट आहे.
गोसेवा

भगवान कृष्णाने प्रथम गोसेवेला प्राधान्य दिलं. त्या काळात गाईगुर चलन म्हणून वापरीत असत. ज्याच्याकडे अधिक गाई तो अधिक श्रीमंत. कल्पतरू असलेल्या गोमातेच्या प्रत्येक गोष्टीतुन मानवाला काही ना काही चांगलच मिळालं आहे. आज गावठी गाईपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर संशोधन चालू आहे. आपल्या गोमूत्राचे चार पेटंट अमेरिकेने घेतले आहेत यावरून आपल्या हें लक्षात येईल. परंतु आज शहरीकरणामूळे मानव गाईचं महत्व विसरून गेला आहे. श्री.राजीव दिक्षित यांनी गाईपासून आपल्याला किती फायदे होतात हे समजवण्यासाठी आपलं आयुष्य वेचल. मानव जर आता जुन्या कृषिसंस्कृती कडे नाही वळला तर अतिविकासामुळे मानव विनाशाकडे जाणार आहे. अस आज अनेक बुद्धिवंतांचे म्हणणे आहे. आपण गाईला आणि मातीला आईच मानतो. हे जाणून काकाश्री यांनी गोसेवेच व्रत हाती घेतल. आपल्या संचितातील काही वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी शास्त्रामध्ये गोग्रास देण्यास सांगितल आहे. आपल्या नावाने गोग्रास देण्याची संकल्पना रूढ केली. आज मठामध्ये अनेक गावठी गाईचं पालन केल गेलं आहे. गोमुत्रापासून, शेणापासून काही प्रोडक्ट तयार करण्याचे प्रयोग चालू आहेत. ज्याच्या प्रयोगाने मानव आपल्या जीवनात केमिकल पासून दूर राहू शकेल. आपलं जीवन समृद्ध करू शकेल. गोमूत्र आज अनेक रोगांवर औषध ठरत आहे. गावठी गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप आरोग्यासाठी हितवर्धक ठरत आहे. याचाच पाठपुरावा काकाश्री करीत आहेत.