भाऊ स्पर्शित वस्तुंचा ठेवा

भाऊ स्पर्शित वस्तुंचा ठेवा

श्री दत्तमहाराज आपला गाणगापूरमधील अवतार कार्य पूर्ण करून, श्री शैल्य येथे निघण्यासाठी, शिष्याना आसन तयार करायला सांगतात. निघताना ते सर्व शिष्याना सांगतात, आम्ही पलीकडे पोचलो कि तुमच्यासाठी प्रसादपुष्प आठवण म्हणून पाठवतो. त्याप्रमाणे काही काळाने ती प्रसादपुष्प येतात. मुख्य शिष्य ती आपसात वाटून घेतात, आणि आपल्या रोजच्या पूजेमध्ये ती समाविष्ट करतात. संत, सद्गुरू, विभूती, सिद्धपुरुष यांच्या शरीरात प्रचंड शक्तीचा संचय असतो. या पवित्र शक्तीची स्पंदने अविरतपणे त्यांच्या शरीरातून बाहेर पडत असतात. याच कारणाने त्यांच्या जवळ राहणाऱ्यांचं आपोआपच कल्याण होत असत. अस म्हणतात की गौतम बुद्ध जेथे जात असत, त्यांच्या पासून अंदाजे १०० किमी.परिघातील परिसरात रोगराई नष्ट होत असे. शरीरातील स्पंदनाचा परिणाम त्यांच्या कापड्यावरही होत असतो. त्यानी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीवर होत असतो. अशा या स्पर्शित वस्तू  शिष्यांसाठी आपल्या गुरुंचा आशिर्वाद असतो. भाऊ एखाद्याने काही विशेष सेवा केल्यास त्याला आपली वापरलेल सोवळ, धोतर, सदरा देत असत. त्यामुळे त्या शिष्याचा अभिमानाने ऊर भरुन येई. त्याशिवाय काही सदरे, पादुका, सोवळी ह्यांचा लिलाव करत. कारण त्यामध्ये त्यांच्या साधनेची स्पंदने असत. जी कठीण काळामध्ये त्या शिष्यास मदत करतात. या अमूल्य वस्तूंमध्ये त्यांच्या सहवासातील नाजूक आठवणी असतात. ज्या वस्तुरूपाने मनाच्या कोपऱ्यामध्ये कायम जपल्या जातात. अश्याच भाऊंनी वापरलेल्या काही वस्तू, सोवळी, धोतर, काठ्या, अंगरखे, आजही त्यांच्या वाशिंद मठात असणाऱ्या त्यांच्या घरामध्ये जपून ठेवण्यात आलेल्या आहेत.  भाऊंचा परिस स्पर्श झालेल्या त्या निर्जीव वस्तूंचा हेवा वाटावा इतक्या नशीबवान आहेत की, अस मनात यावं की हा नरजन्म मिळण्याऐवजी मला त्यांच्या सदैव हातात असणाऱ्या काठीचा जन्म का नाही मिळाला. अशाच काही त्यांनी वापरलेल्या  वस्तूंचे  काही फोटो आम्ही खाली प्रदर्शित करीत आहोत.

भाऊ महाराज निवासस्थान ,वाशिंद