नामस्मरण

नामापरिस सोपे आन । अंतशुद्धीस नाही साधन । नाम जिव्हेचे भूषण । नाम पोषण परमार्था ।। नाम घ्यावया नलगे स्नान । नामासी नाही विधिविधान । नाम सकळपापनिर्दाळण । नाम पावन सर्वदा ।। अश्या ह्या नामाचा महिमा सर्व संताने गायला आहे. भाऊ महाराजांनी आपल्या सर्व मठात दिवेलागणीच्या वेळी दिगंबराच्या नामघोषाचा दंडक घालून दिलेला आहे. तसेच वाशिंद ह्या मठामध्ये असलेल्या दत्त पादूकावरील उपचार, म्हणून ‘विशेष २१ दिवस अखंड नामघोष’ केला जातो. रोजच्या नामघोषानंतर आरती आणि दत्तस्तोत्रे म्हटली जातात. गुरुवारच्या पालखीची शेवटची भैरवी सुद्धा ह्याचीच आठवण सतत करून देते. नामासाठी त्वरा करा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा