मंत्र प्रशिक्षण

अथर्वशीर्ष / गुरुगीता पठण प्रशिक्षण. अतिविकासाच्या दूरगामी परिणामामुळे आजची पिढी वाया जाऊ नये, त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच सामान्य व सर्व वर्गातील माणसाला मंत्राच प्रशिक्षण मिळावं, अध्यात्मातील गहन, उपयुक्त ज्ञान सर्वांसाठी खुल व्हावं, या साठी भाऊ महाराजानी कामगार भागात अथर्वशीर्ष व गुरुगीता या मंत्राचे विनामूल्य प्रशिक्षण सुरू केले. मंत्र पठणाने स्ममरणशक्ती कशी वाढवावी याच विज्ञाननिष्ठ शिक्षण सुरु केलं. कोणत्याही गोष्टीत प्राविण्य मिळविणे बुद्धीच्या क्षमतेवर अवलंबून असते. येणारी नवीन पिढी कोणत्याही गोष्टीत कमी पडू नये, बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची शिखरे पार करत असताना, त्यांचे पाय आध्यात्मिक साधनेत राहायला हवेत .अशा पिढीला घडवण्याचे कार्य भाऊंनी आपल्या हाती घेतल. जी पिढी उद्याच्या भारताचं नेतृत्व करेल. ज्या प्रक्रियेतुन सुजाण नागरिक घडतील.