काही वर्षांपूर्वी ऋणमोचन यात्रेमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होत असे. परंतु शिक्षणा अभावी स्वच्छतेचं आणि शिस्तीच वावडं होत. यात्रा संपल्यावर घाणीच साम्राज्य पसरायच. एका तरुणाला ते पाहवल नाही व त्याने झाडू घेऊन कामाला सुरुवात केली. त्या युवकाकडून आपल्या देशातील लोकांनी स्वच्छतेचा धडा घेतला. त्या युवकाला पुढे लोक ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. प्रत्येक संतांनी आपल्या कार्यकाळात जगाला एक संदेश दिला, एक शिकवण दिली. तळागाळातील गरीब दुबळ्या बांधवांसाठी संत नेहमीच आशेचा किरण ठरले. ज्यांनी अशी लोकपयोगी कार्य केली, सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकले, तेच आदर्श ठरले. बाबा आमटे, प्रकाश आमटे, राणी बंग व डॉ. बंग, डॉ. कोल्हे इ. मंडळींनी आपल्या कर्तृत्वाने खरतर मानवी नैतिकतेची मर्यादा पार टोकाला नेउन ठेवली. या मंडळींना आपण आधुनिक संतच म्हणू शकतो . ज्यांनी आपलं अख्ख आयुष्य या कार्यासाठी वेचल. गांधीजी नेहमी आपल्या सहकार्यांना म्हणायचे. खरा भारत पाहायचा असेल तर खेड्यात चला. अजूनही खरा भारत खेड्यातच आहे. जे गाडगे बाबांना समजलं, ते बहुधा कोणालाच समजलं नसावं. लोक त्यांना संत ठरवून मोकळे झाले परंतु त्यांनी दिलेली शिकवण सोईस्करपणे विसरले. आजही कित्येक लोक आपल्या देशबांधावांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घालत आहेत.
वाडा, जव्हार परिसर मुंबई पासून १५० की. मी वर असूनही अजून त्यांच्यापासून विकास लांब आहे. मुलांना शाळेत जायला काही किलोमीटर प्रवास करावा लागतो. तेथेही योग्य शिक्षण मिळेल याची खात्री नाही. कोणी आजारी पडलं तर जवळ डॉकटर नाही. बाजाराच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात अपेक्षित व्यवस्था नसते. खूपच कोणी आजारी झाला तर गाडीने हॉस्पिटलला नेण्यासाठी खिशात पैसे नसतात. इतकी गरिबी आहे. आज काही संस्था तेथे काम करत आहेत. परंतु गरज फार मोठी आहे. लोणावळ्यात गर्भश्रीमंत लोक राहतात, हे सर्वांना महित आहे. पण ज्यांच्या जमिनी घेऊन हे उभं राहिल आहे ते भूमिपुत्र जंगलात आत ढकलले गेले आहेत. खंडाळ्याच्या घाटाच वर्णन आपण नेहमी ऐकतो. परंतु त्या घाट जंगलात कित्येक वर्ष हजारो लोक रहात आहेत. ज्यांचा आवाज अजूनही आपल्या पर्यंत पोहचला नाही आहे. न संपणाऱ्या समस्यांचं ओझं खांद्यावर घेऊन ते जगत आहेत. काही लोक डोंगरावर वस्ती करून रहातात. त्याच्या घराची संख्या खूप कमी असल्याने गाव म्हणता येत नाही व पर्यायी गावाला मिळणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना होत नाही. डहाणू , पालघर या विभागात कित्येक आदिवासींच्या जमिनीवर आज फळाच्या बागा उठवल्या गेल्या आहेत व तेच आदिवासी तेथे देखरेखीच काम करीत आहेत. सरकारी योजना तळापर्यंत पोहचत नाहीत. वरून सोडलेलं पाणी मध्येच झिरपून जात. तळाला वाट पाहणारा तृषार्त ओंजळभर आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. नर्मदे कीनारीही अनेक मठ आहेत, संस्थान आहेत. परंतु परिक्रमा करणाऱ्याना आदिवासिच जगवतात हे निर्विवाद सत्य आहे. किनारी पसरलेल्या डोंगरदऱ्यात राहणाऱ्या लोकांना एवढंच माहित असाव की ते भारताचे नागरिक आहे. शिक्षण, सुविधा, सरकारी योजना, सवलती या गोष्टि अजूनही पुस्तकाच आहेत. मेधा पाटकर यानी ३-४ ठिकाणी वनवासी मुलांसाठी आश्रम शाळा चालू केल्या आहेत. त्या आश्रमशाळेत शिकलेले मोठे झाले व त्याच शाळेत शिक्षक म्हणून तूटपुंज्या पगारावर काम करु लागले. पाटकरांची संस्था त्याना पगार देते. इतकी वर्ष झाली पण शाळेत काही फरक पडू शकला नाही. कित्येक समाजसेवक आपल्या जबाबदारीवर तेथील मुलाना मोफत शिक्षण देत आहेत. झोपड़ीवजा घरात शाळा चालते. पोटभर अन्न मिळवण्यासाठी लोकांना नदीशिवाय पर्याय नाही. सरपणासाठी जंगल तोड केल्याने झाड नाहीत. शेती करण्यासाठी जमीन नाही. शिक्षणाचा अभाव या सर्व कारणांनी तेथील वर्ग पिचला गेला आहे. यंत्रवत आयुष्य जगत आहे. मठामध्ये, संस्थामध्ये नोकरी करून काही लोक आपली गुजराण करीत आहेत. दुर्गम भागात राहणाऱ्या सर्वच ठिकाणी अशा प्रकारच्या अव्यवस्था पहावयास मिळतात.
|| जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा ||

भाऊ महाराजांचा पिंडच मूळ समाजसेवकाचा. राजकारणात राहून देशभक्ती करणारे हाताच्या बोटावर मोजणारे असावेत. त्यातील एक भाऊ महाराज. एक IAS असणारी व्यक्ती लालबागच्या १०×२० फुटाच्या घरात आपलं आयुष्य काढते हे खरं वाटणार नाही आहे. ज्यांच्या रक्तातच देशभक्ती भिनलेली असते. ते आपल्या आयुष्यावर निखारा ठेवूनच जगत असतात. हजारो आमिष समोर आली, तरी त्यात न पडता प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून समाजसेवा करणारा पुरुष विराळाच. दत्त भक्तिचा झेंडा खांद्यावर घेतल्यावर भाऊनी एका वेगळ्या तऱ्हेने आपल काम सुरु केल. मुंबईच्या नजिक दत्तस्थान उभाराव या कल्पनेने वाशिंद या दुर्गम विभागाची निवड केली. मठाच काम चालू असताना, आजुबाजुच्या पाडयात अन्नछत्र सुरू केल. या विभागातील लोकांसाठी एका मोठ्या आरोग्य शिबिराच आयोजन केल. दुरदुरच्या पाड्यातील लोकांना शिबिरात आणण्यासाठी टेम्पो पाठवण्यात आले होते. या शिबिरासाठी मुंबईचे ३३ डॉक्टर आले होते. मठाच्या आजुबाजुच्या परिसरातील लोकांसाठी मिनी हॉस्पिटल बांधण्याचा भाऊंचा मानस होता. प्रत्येकवेळी ते या विषयी बोलून दाखवत. परंतु त्यांच्या हयातीत त्याना ते पूर्ण करता आले नाही. एकदा एका शिष्याने तयारी दर्शवित हॉस्पिटलचा विषय काढल्यावर त्यानी त्यावर मार्गदर्शन केले होते. या परिसरात कशाप्रकारे फिरता दवाखाना चालू करायचा, मग सरकारला अहवाल सादर करायचा, नंतर गावागावत मेडिकल कैम्प आयोजित करायचे, आणि मग सरकारच्या मदतीने मिनी हॉस्पिटल उभे करायचे. अगदी सविस्तर माहिती दिली होती. देशबांधवासाठी खरी समाजकार्याची ज्योत त्यांच्या मनात अखंड तेवत होती.
समाजातील दुर्लक्षित लोकांना सढळ हाताने मदत करावी, हीच भाऊंची शिकवण..!! भाऊंनी सर्व शिष्यांना देवभक्तीबरोबर समाजसेवेची दीक्षा दिली. त्याचबरोबर आपल्याजवळील सर्व लोकांनाही ह्या प्रवाहात आणण्यासाठी प्रवृत्त केले. हाच वसा त्यांच्या शिष्यानीही तसाच पुढे चालवला आहे. इतर समाजसेवक तसेच संस्थाना बरोबर घेऊन, दुर्गम भागातील सामाजिक कार्य आजतागायत चालू ठेवले आहे.
https://www.facebook.com/740236679436897/posts/1935180763275810/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1893569227436964/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1851415818318972/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1808634495930438/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1808058009321420/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1787954627998425/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1768761756584379/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1690772524383303/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1685352441591978/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1601567336637156/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1556868564440367/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1516443231816234/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1493715400755684/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1463517170442174/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1448163758644182/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1432431100217448/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1431233980337160/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1403596086434283/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1347657328694826/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1333137900146769/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1321466097980616/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1192001867593707/
https://www.facebook.com/740236679436897/posts/1063725053754723/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2534842980137640/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2558865347735403/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2591218307833440/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2610662992555638/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2627164034238867/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2685279298427340/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2657883704500233/
https://www.facebook.com/2409646245990648/posts/2675214662767137/