उच्चारशास्त्र – स्मरणशक्ती

या विश्वाची उत्पत्ती एका मोठया स्फोटातून झाली असे वैज्ञानिकांचे मत आहे. आपल्या पूर्वजांनी हेच वेगळया शब्दांत मांडले. एक मोठा ॐकार ध्वनी आला आणि त्यातून विश्वाची निमिर्ती झाली. ॐकाराला अनन्य साधारण महत्व आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे अ, उ, म यांची निमिर्ती ॐ कारातून झाली किंवा या तिन्ही तत्वाचा मिळून ॐ आकारास येतो. पाश्चिमात्य लोक देवाला गॉड (GOD) म्हणतात. G म्हणजे Generate, O म्हणजे Operate, आणि D म्हणजे Distroy. हेच तत्व पूर्वजांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश याबाबतीत उत्पत्ती, स्थिती आणि लय या स्वरूपात मांडले आहे. या तिन्ही गोष्टींचे मूळ ॐ कारात आहे. वेगळया अर्थाने सांगायचे म्हणजे ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या स्पंदनांना, अरूर्त स्वरूपाच्या लहरीमधील शक्तीची ओळख आपल्या पूर्वजांना होती. मंत्र पठणाला वैदिक धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. कोणताही विधी मंत्राशिवाय पूर्ण होत नाही. ऋग्वेदांमधील ऋचांमध्ये निसगदेवतांना आवाहन केलेले आहे. निसर्गदेवतांना मंत्राद्वारे आवाहन, प्रार्थना, स्तुती करण्याची प्रथा होती. शेती चांगली व्हावी म्हणून वरूणराजांना प्रसन्न करण्याकरीता `पर्जन्यसुक्त’ म्हटले जात होतं. खरच यामध्ये काही तथ्य नसते तर आपल्या पूर्वजांनी इतकी हजारोवर्षे का जोपासल असत? महादेवांवर एक संस्कृतपद आहे, `या सृष्टी सृर्ष्टु आद्याम’ याचा अर्थ या सृष्टीचा निर्माणकर्ता सृष्टीच्या आगोदरचा आहे. मंत्राद्वारे विविध देवदेवतांना आवाहन करून त्यांचा आशिर्वाद प्राप्त करून घेण्याची पध्दत आजतागायत चालू आहे. ऋषीमुनींनी वेदांची निमिर्ती केली. प्रत्येक मंत्रांची निमिर्ती सूत्र रूपात केली गेलेली आहे. याचा अर्थ कमीतकमी शब्दात वाचार्थ, भावार्थ, गुढार्थ लपलेला असे. उदा. `तदेजती तन्नेजती तद्दूरे तत्समीपके! तद्नंतरस्य सर्वस्य तदू सर्वस्यबाह्यत:’ यामध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन यांच्याभोवती फिरणारा इलेक्ट्रॉन संरचना गुढार्थाने मांडली आहे.

आपल्या पूर्वजांनी एकच मंत्र आपल्या उच्चारशास्त्राप्रमाणे विविध पध्दतीत म्हटला असता प्रत्येक पध्दतीबरोबर वेगवेगळा परिणाम होत होतो. या सिध्दांतावर काही मंत्रपठणाच्या पध्दती ठरविल्या. त्यासाठी आवश्यक नियम बनविण्यात आले. उदा. कंठातील ॐ वेगळा व खर्जातील ॐ वेगळा. शक्तीपात दिक्षा झालेल्या साधकांची साधना चालू असताना त्यांच्या मुखातून उच्च कोटीतला दीर्घ ॐ कार बाहेर पडतो व त्यांची कुंडलीनी जागृत होते. गायत्री मंत्र सुध्दा एकेरी म्हणण्याची पध्दत आहे. रूद्र मंत्र ऋग्वेदीय ब्राह्मण वेगळया तऱ्हेने म्हणतात व यर्जुवेदीय वेगळया पध्दतीत म्हणतात. मंत्राच्या उच्चारावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. मंत्राचे, स्तोत्राचे विविध पध्दतीत उच्चारण करून त्याचे विविध परिणाम निर्माण करण्याच्या शास्त्राला `उच्चारशास्त्र’ म्हणतात. आपण आपल्या दैनंदिन जीवनातही या गोष्टी कळत नकळत वापरत असतो. कोणी रस्त्यात भेटल्यावर, घर जवळ असल्यास, `येता का घरी?’ अस मृदु आवाजात विचारल्यावर कोणी सहज येईल पण जर आपण हे कोणाला रागात, ओरडून म्हटले तर ती व्यक्ती पळून जाईल. शब्द तेच पण उच्चाराची पध्दत बदल्यावर परिणाम बदलतो. मंत्रांच्या बाबतीत असच काहीसं आहे. व्यंकटेश स्तोत्र एक वेगळया पध्दतीत जंगलात म्हटल्यावर समोर नाग उभा राहतो, हे एकदा भाऊ महाराजांनी एका डॉक्टरला प्रत्यक्ष प्रयोग करून दाखविले. ही जादू नसून उच्चारशास्त्राचा अविष्कार आहे. घोरात्कष्टउध्दरण स्तोत्र विशिष्ट पध्दतीत 108 वेळा म्हटल्यास शारिरीक आजार दूर होतात असे अनेक अनुभव आहेत ते नक्की आहे तरी काय?

इसवी सन १८७५ एका इंग्रज डॉक्टरांनी माणसाचा मेंदू – चेतासंस्था – विद्युतलहरी बाहेर टाकते हे शोधून काढले. डॉ. हान्स बर्जर यांने इ.स. १९२८ मध्ये मेंदूतून बाहेर पडणाऱ्या लहरींचा अभ्यास करून त्या सलग येत नसून, थांबून थांबून कालांतराने बाहेर टाकल्या जातात हे सिध्द केलं. इतकेच नव्हे तर उपकरणाद्वारे आलेख नोंदवून दाखविला. या लहरी सुध्दा क्षीण व तरतलम असतात. त्याचा दाब सुमारे १ कोटयाश व्होल्ट इतका असतो. म्हणजे अशा तीनशे कोटी लहरी एकत्रीत केल्यातर लहानशा विजेरीचा दिवा क्षणमात्र लागू शकतो. मेंदूतून बाहेर पडणाऱ्या लहरी प्रतिसेकंद मोजल्या जातात. माणूस गाढ झोपेत असताना प्रतिसेकंद १ ते ३ लहरी बाहेर पडतात. यांना डेल्टा (D) लहरी म्हणतात. माणसाच्या भावनावेगाबरोबर निगडीत असलेल्या लहरींना थीटा (q) लहरी म्हणतात. या प्रती सेकंद ४ ते ७ असतात. माणूस आरामात विश्रांती घेत असताना यांचा वेग ८ ते १२ असतो. यांना अल्फा लहरी  म्हणतात. तसेच माणूस खूप विचारात, चिंतेत असताना, गुंतागुंतीच्या प्रक्रियेवेळी या लहरी १३ ते २२ असू शकतात. यांना बीटा लहरी म्हणतात. (सं.ग्रं. अज्ञाताचे विज्ञान)

ज्याप्रमाणे मेंदूतून विचारांची स्पंदने बाहेर पडत असतात हे जर खरे असेल तर मंत्रांच्या उच्चारामुळे किती ध्वनीस्पंदने निमार्ण होत असतील. ही स्पंदने आपण दुसरीकडे पाठवू शकतो. एखाद्या कायार्साठी मंत्र पठणापूर्वी संकल्प करण्याची पध्दत आहे. हा संकल्प म्हणजे एखाद्या लोड केलेल्या मिसाईलला दिलेला प्रोग्राम असे म्हणू शकतो. जस प्रोग्राममध्ये ठिकाण, दिशा, वेग इ. फिड केलेली असते त्याप्रमाणे मिसाईल योग्य ठिकाणी पोहोचते. त्याचप्रमाणे मंत्रांपासून निर्माण होणारी स्पंदन संकल्पाद्वारे इच्छित स्थळी पोहोचतात व आपलं काम पूर्ण करतात. उच्चारशास्त्रामध्ये आणखी एक गंमत आहे की, मंत्रांची, कंपनांची वलय निर्माण होतात. ही वलये घंटेच्या आघाताप्रमाणे काम करतात. घंटा वाजवली असता ज्याप्रमाणे घंटेच्या आत तरंग निर्माण होतात तसेच बाहेरही निर्माण होतात. उच्चारशास्त्र असेच काम करते. उच्चार करणाऱ्याच्या शरीरात कंपने निर्माण होतात. ज्याने शरीरातील चक्रे व नाडया जागृत होतात व उच्चारावाटे निर्माण होणारी कंपने संकल्पपूर्तीचे काम करतात. उदा. अथर्वशीर्षाने मुलाधार चक्र जागृत होते, गुरूगीताने स्वाधीष्ठान चक्र जागृत होते, ॐ काराने मणीपूर चक्र जागृत होते व भजनाने विशुध्द चक्र जागृत होते. मंत्रांमधील काही उच्चाराने आपल्या टाळूच्या वर असलेल्या नाडया जागृत होतात. विशिष्ट पध्दतीच्या वारंवार उच्चाराने, आवर्तनाने म्हणणाऱ्याच्या पेशी-पेशींवर परीणाम व्हायला लागतो. परंतु एक नियम महत्वाचा आहे, तो असा की, मंत्र योग्य तऱ्हेने म्हणण्यासाठी योग्य शिक्षकाकडून शिकून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक मंत्राची एक देवता आहे. तिचं स्मरण करून, तिला शरण जाऊन मंत्रोच्चार करावयाचे असतात. मंत्र उच्चारणाबरोबर इतर काही गोष्टी महत्वाच्या असतात. ज्या स्थानात करणार ते स्थान पवित्र असणे अधिक चांगले. जसे बीज चांगले असेल पण जमीन खडकाळ असेल तर ते बीज तेथे रूजणार नाही. आसनशुध्दी महत्वाची आहे. आपल्या शरीरात निर्माण होणारी स्पंदने गरजेपेक्षा जास्त झाल्यास मूलाधार चक्रामार्फत तितक्याच स्पंदनाचा, लहरींचा निचरा व्हावयास हवा. सर्व निचरा झाल्यास उपयोगाचे नाही व अजिबात न होणे सुध्दा अयोग्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मंत्रपठणाला सद्गुरूंचे आशिर्वाद असणे गरजेचे आहे. सद्गुरू कृपेशिवाय कोणतेही कार्य इष्टप्राप्ती होणे संभवनीय नाही.

मंत्रोच्चाराचे अनेक फायदे आहेत. मुख्य फायदा म्हणजे स्मरणशक्तीत वाढ होणे. मुळात अथर्वशीर्षाची निमिर्ती याच गोष्टीमुळे झाली आहे. पूर्वीकाळी लेखणाची पध्दत, किंवा लिपी जन्माला आली नव्हती. तेव्हा लोक आपापसात बोलत होते. तेव्हांची भाषा हे बोलण्याचे माध्यम होते, लिखाणाचे नव्हे. पुढच्या काळात ज्ञान संग्रहीत करण्यासाठी लिपीचा उदय झाला. तत्पूर्वी पठण व पाठण ही पध्दत होती. गुरू आपले ज्ञाने शिष्याला देत असत व त्याच्याकडून पाठ करून घेत असत. पुढे तो शिष्य आपल्या शिष्याला त्याचप्रमाणे तयार करीत असे. पुढील काळात ज्ञानाचे भांडार वाढत गेले. आजच्या काळात आपल्या कॉम्प्युटरमध्ये Hard-disk असते, ती तिच्या Capacity प्रमाणे माहिती (data) जमा करते. आपल्याला आणखी माहिती जमा करायची असल्यास आपण Hard-disk क्षमता वाढवतो. तत्कालीन मानवाने तेच केले. मेंदूची ज्ञान वाढवण्याची, साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मंत्रांची निर्मिती केली. गणकऋषींनी अथर्वशीर्षाची रचना केली. अथर्वशीर्षाची देवता गणपती आहे व गणपती ही विद्येची, बुध्दीची देवता आहे हे सर्वश्रुत आहे. मंत्रोच्चाराने मेंदूची ज्ञान साठवण्याची क्षमता वाढवण्यात आली. म्हणजेच स्मरण शक्ती वाढवली गेली. अथर्वशीर्षात एक वाक्य आहे, `त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम्’ याचा अर्थ तू मूलाधार चक्राच्या ठिकाणी स्थित आहेस. मुळातच मुलाधार चक्र म्हणजेच गणपती. अथर्वशीर्षाच्या पठणाने मुलाधार चक्र जागृत होते. मूलाधार चक्राचे स्थान आपल्या दोन गुप्तांगामध्ये मेरूदंडाच्या खाली आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की मुलाधार चक्राचा व मेंदुचा संबंध काय?

मुलाधार चक्राच्या वरती पाठीच्या मणक्याला सुरूवात होते. वर जाऊन तो मेंदूपर्यंत पोहोचतो. मणक्याभोवती असलेली मज्जासंस्था, चेतासंस्था मेंदूला जोडली गेली असते. योगशास्त्राप्रमाणे आपल्या मणक्यातून एक सफेद दोरा गेला आहे त्यालाच `कुंडलिनी’ म्हणतात. हा दोर जीवतंतूनी वेष्टिलेला असतो. आपल्या भारतात जुन्या मंदिरात बऱ्याच ठिकाणी दोन नागाचे वेटोळे असलेले शिल्प पहावयास मिळते. हे शिल्प म्हणजे सर्पाकार `क्रोमोझोन’ चे प्रतिक आहे. याचा अर्थ आपल्या पूर्वजांना डिएनए (DNA) माहित होता. आपण त्याला गुणसुत्र म्हणतो. वशिष्ठऋषी आपल्या ग्रंथामध्ये `योगवशिष्ठ’ याचा उच्चार `गुणविधी’ असा करतात. आताच्या विज्ञानाला गुणसूत्राच्या २३ जोडया माहित आहेत. परंतु वशिष्ठऋषींनी २५ जोडयांचा उल्लेख केला आहे. २४ व्या जोडीला ते `प्रबुध्द’ म्हणतात व २५ व्या जोडीला `बुध्द’ असे म्हटले आहे. याचा दुसरा अर्थ असा की आजच्या विज्ञानाला २४ व २५ व्या जोडया अजून सूक्ष्मदर्शक असूनही सापडल्या नाहीत. क्रोमोझोनच्या रचनेचा सखोल अभ्यास असल्याने तत्कालीन ऋषीमुनींनी योगमार्गाच्या जोरावर, त्यावर सुपरिणाम करणारी मंत्र-मंत्रपध्दती जन्माला घातली. योग्य तऱ्हेने मंत्राचे पठण केल्यास मूलाधार चक्र जागृत होते. त्याचबरोबर मणक्यातील दोराभोवती वेष्टीत जीवतंतू जागृत होतात. हे जीवतंतू हळूहळू दोराभोवती असलेल्या सर्व तंतूना जागृत, प्रभावित करतात. ही मालिका मेंदूपर्यंत जाऊन पोहोचते. आपल्या मेंदूची संरचना फार क्लिष्ट व किचकट आहे. पूर्ण मेंदू करडया पेशींनी भरला आहे. या करडया पेशींमध्ये ज्ञान, माहिती साठवलेली आहे. शरीर नियमाप्रमाणे काही पेशी मरत असतात व पुन्हा तेवढयाच पेशी निर्माण होत असतात. या जन्म-मरणाच्या शृंखलेत ज्ञानाचे आदान-प्रदान होत असते. बऱ्याचदा अस ऐकायला मिळते की, माझा मुलगा लहान असताना खूप हुशार होता, पण पुढे तो ढब्बू कसा झाला हे कळत नाही. याचं कारण अगोदरच्या पेशींनी आपले ज्ञान पुढच्या पेशीकडे दिले नाही.

दुसरा भाग असा की, एक तर ४०% मेंदू कामच करत नसतो. उरलेल्या ६०% मध्ये जी केंद्र जागृत आहेत त्यातील ज्ञान आपल्याला असते. सोप्या भाषेत सांगायचे तर मेंदूचा प्रत्येक विभाग हा एखाद्या विषयाच मुख्यालय असत. प्रत्येक मुख्यालयात अनेक विभाग, उपविभाग असतात. अशी बरीच मुख्यालय आपल्या मेंदूत असतात. आपण ज्या विषयाच ज्ञान मिळवतो, त्याचा विचार करतो ते मुख्यालय चालू असते. उदा. एखादा संगीतकार असेल तर संगीतासंबंधी असलेला विभाग चालू असतो, काम करत असतो. पण त्याच्याच मेंदूत असलेला चित्रकलेचा विभाग निद्राधीन असतो, सुप्तावस्थेत असतो. कारण त्या विभागाला तो काहीच काम देत नसतो. आपल्या सर्वांच्या बाबतीत असच होत असत. प्रत्येकजण एखाद्या विषयात तरी प्रविण असतो. म्हणजे त्या विषयासंबंधीचे केंद्र कोणत्या तरी कारणाने म्हणा किंवा अनुवांशिकतेने जागृत असतो. एखादि व्यक्ती एखाद्या विषयात कमालीची हुशार असते. कारण त्यासंबंधी असलेले मुख्यालय पूर्णपणे काम करीत असते. मग असा प्रश्न उभा रहातो की, बाकीच्या मुख्यालयांच किंवा केंद्रकांच काय?

आता आपण मूळ विषयावर येऊ या, मूलाधार चक्रासहित जागृत झालेले जीवतंतू मेंदूपर्यंत पोहोचून त्यातील प्रत्येक केंद्र जागृत करायला सुरूवात करतात. कालांतराने आपल्याला असे जाणवू लागते की, कोणत्याही विषयात आपण प्राविण्य मिळवू शकतो. अशक्य नाही असे काही नाही. हाच साधनेचा मूळ गाभा आहे. आपण स्वत: मंत्रोच्चाराने प्रतिभावंत, प्रज्ञावंत होणे. सावरकर, लिओनार्दो द विंची अशी अनेक व्यक्तींची उदा. आपल्याला देता येतील. ज्या व्यक्ती अनेकविध विषयांत पारंगत होती. लोकमान्य टिळकांच्या सभेत वयाच्या १२ व्या वर्षी शिवरायांवर संस्कृत पद म्हणणारे सावरकर किंवा १६ व्या वर्षी गीतेवर टिका करणारे ज्ञानेश्वर माऊली ही त्याचीच उदाहरणे आहेत. परदेशातही अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या. मूळ मुद्दा असा की, जे मुळातच असामान्य बुध्दीचे आहेत त्यांची गोष्ट वेगळी, पण जे सामान्य बुध्दीचे आहेत, ज्यांचा (IQ) ६0 ते १00 पर्यंत आहे ते विद्यार्थी मंत्रपठणाच्या जोरावर आपला (IQ) वाढवू शकतात. विविध विषयांत पारंगत होऊ शकतात. हाच धागा पकडून `सदगुरु श्रीभाऊ महाराजांनी‘ ही मंत्र संपदा सर्वजणांना वाढण्यास सुरूवात केली. जे एका विशिष्ठ वर्गाकडेच आहेत ते सर्व समाजाकडे भेदभाव न करता, वैज्ञानिकदृष्टीकोणातून समजावून पोहोचल पाहिजे. आताची पिढी विज्ञाननिष्ठ आहे. त्यांना त्याच भूमिकेतून समजवण्याचं कार्य भाऊ महाराजांनी केलं. मंत्राचे दालन सर्वांसाठी खुले केले. नियम एकच -`फक्त पेरत जायचं.’ जिथे जमीन चांगली असेल तिथे नक्कीच रूजेल. अध्यात्माची कास पकडून या देशासाठी उत्तम कार्य करणारा तरूण घडावा हे त्यांचे मूळ स्वप्न होत. हे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलेही.

आता आपण मूळ विषयावर येऊ या, मूलाधार चक्रासहित जागृत झालेले जीवतंतू मेंदूपर्यंत पोहोचून त्यातील प्रत्येक केंद्र जागृत करायला सुरूवात करतात. कालांतराने आपल्याला असे जाणवू लागते की, कोणत्याही विषयात आपण प्राविण्य मिळवू शकतो. अशक्य नाही असे काही नाही. हाच साधनेचा मूळ गाभा आहे. आपण स्वत: मंत्रोच्चाराने प्रतिभावंत, प्रज्ञावंत होणे. सावरकर, लिओनार्दो द विंची अशी अनेक व्यक्तींची उदा. आपल्याला देता येतील. ज्या व्यक्ती अनेकविध विषयांत पारंगत होती. लोकमान्य टिळकांच्या सभेत वयाच्या १२ व्या वर्षी शिवरायांवर संस्कृत पद म्हणणारे सावरकर किंवा १६ व्या वर्षी गीतेवर टिका करणारे ज्ञानेश्वर माऊली ही त्याचीच उदाहरणे आहेत. परदेशातही अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या. मूळ मुद्दा असा की, जे मुळातच असामान्य बुध्दीचे आहेत त्यांची गोष्ट वेगळी, पण जे सामान्य बुध्दीचे आहेत, ज्यांचा (IQ) ६0 ते १00 पर्यंत आहे ते विद्यार्थी मंत्रपठणाच्या जोरावर आपला (IQ) वाढवू शकतात. विविध विषयांत पारंगत होऊ शकतात. हाच धागा पकडून `सदगुरु श्रीभाऊ महाराजांनी‘ ही मंत्र संपदा सर्वजणांना वाढण्यास सुरूवात केली. जे एका विशिष्ठ वर्गाकडेच आहेत ते सर्व समाजाकडे भेदभाव न करता, वैज्ञानिकदृष्टीकोणातून समजावून पोहोचल पाहिजे. आताची पिढी विज्ञाननिष्ठ आहे. त्यांना त्याच भूमिकेतून समजवण्याचं कार्य भाऊ महाराजांनी केलं. मंत्राचे दालन सर्वांसाठी खुले केले. नियम एकच -`फक्त पेरत जायचं.’ जिथे जमीन चांगली असेल तिथे नक्कीच रूजेल. अध्यात्माची कास पकडून या देशासाठी उत्तम कार्य करणारा तरूण घडावा हे त्यांचे मूळ स्वप्न होत. हे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलेही.

श्री. समीर एकनाथ चव्हाण